ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 06:27 IST2025-10-02T06:27:01+5:302025-10-02T06:27:23+5:30
गाझातील युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी शांतता योजना जाहीर केली असली तरी इस्रायलने गाझा पट्टीत बुधवारीही हल्ले केले. त्यात १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
जेरुसलेम : गाझातील युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी शांतता योजना जाहीर केली असली तरी इस्रायलने गाझा पट्टीत बुधवारीही हल्ले केले. त्यात १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांच्या योजनेला हमासने अद्याप मान्यता दिली नसून त्याबाबत ही दहशतवादी संघटना कधी निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गाझामध्ये जे पॅलेस्टिनी नागरिक राहतील त्यांना दहशतवादी व दहशतवाद्याचे समर्थक म्हणून घोषित केले जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बुधवारी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला आहे. गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांनी हा भाग त्वरित सोडावा, त्यांच्यासाठी ही अखेरची संधी असेल, अशीही धमकी या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांतील गाझा शहरातील झैतून भागातील अल्-फलाह नावाच्या शाळेत विस्थापित नागरिकांनी आश्रय घेतला आहे.