भारत-अमेरिकेचा वाढता दबाव, अटकेच्या भीतीनं हाफिज सईदची उडाली गाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 17:13 IST2018-01-24T16:36:56+5:302018-01-24T17:13:37+5:30

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदची अटकेच्या भीतीने भंबेरी उडाली आहे.

hafiz-saeed-pakistan-terrorist-america-unsc-team | भारत-अमेरिकेचा वाढता दबाव, अटकेच्या भीतीनं हाफिज सईदची उडाली गाळण

भारत-अमेरिकेचा वाढता दबाव, अटकेच्या भीतीनं हाफिज सईदची उडाली गाळण

इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदची अटकेच्या भीतीने भंबेरी उडाली आहे. हाफिजने अटक टाळण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. ‘भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळे आपल्याला अटकेची शक्यता असल्याचे,’ त्याने या यचिकेत म्हटलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित संस्थांची संपत्ती जप्त केलीच जाईल, याचा पुनरुच्चार केला.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची 1267 सेक्शंसचं एक शिष्टमंडळ या आठवड्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. हे शिष्ठमंडळ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळतो की नाही, याची पाहाणी करणार आहे. दोन दिवसीय हा दौरा गुरुवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हाफिजला अटकेची भीती सतावत असून, अटकपूर्व जामीनासाठी त्याने हायकोर्टात धाव घेतली आहे. 

या दौऱ्यात हाफिजवर कारवाईसाठी राष्ट्र संघाकडूनही पाकिस्तानवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे हाफिजने अटक टाळण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. ‘आपल्याला अटक करु नये, तसेच आपल्या कोणत्याही संघटनांवर कारवाई करु नये,’ अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिजची संपत्ती जप्त केलीच जाईल, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन, पाकिस्तान दहशतवाद विरोधातील लढाईत कोणतीही साथ देत नसल्याचा आरोप केला होता. तसेच, पाकिस्तान एक नंबरचा खोटारडा आणि विश्वासघातकी देश असल्याचं म्हटलं  होतं.

Web Title: hafiz-saeed-pakistan-terrorist-america-unsc-team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.