शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

Hafiz Saeed: मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 9:43 PM

Hafiz Saeed: मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानी कोर्टाने विविध प्रकरणात 68 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

लाहोर: भारताचा मोस्ट वाँटेड पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला(Hafiz Saeed) लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 3 लाख 40 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर दहशतवादी हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हाफिज सईदला टेरर फंडिंगशी संबंधित दोन वेगवेगळ्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंडजमात-उद-दावा (JUD) प्रमुख हाफिज सईदला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. अमेरिकेने त्याच्या डोक्यावर 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा इनामही ठेवला आहे. हाफिज सईद 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात वॉन्टेड आहे. मुंबईच्या ताज हॉटेमध्ये झालेल्या त्या हल्ल्यात 161 लोक मारले गेले होते.

एकूण 68 वर्षांची शिक्षापाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला अशाच अन्य पाच प्रकरणांमध्ये 36 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. म्हणजेच एकूण 68 वर्षांच्या कारावासाची शिक्षा एकत्रितपणे चालेल. एका वकिलाने सांगितले की, सईदला अनेक वर्षे तुरुंगात घालवावी लागली नाही कारण त्याची शिक्षा एकाचवेळी चालणार आहे.

सईद 2019 पासून तुरुंगातशुक्रवारी दहशतवाद विरोधी न्यायालयाचे (ATC) न्यायाधीश एजाज अहमद यांनी सईदला पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने नोंदवलेल्या दोन FIR 21/2019 आणि 90/2019 मध्ये शिक्षा सुनावल्याचे सांगितले. सईद जुलै 2019 पासून कोट लखपत या तुरुंगात कैद आहे. सईद लाहोरहून गुजरानवालाला जात असताना जुलै 2019 मध्ये दहशतवादविरोधी विभागाने (CTD) त्याला अटक केली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhafiz saedहाफीज सईद26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला