दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:16 IST2025-11-11T14:14:27+5:302025-11-11T14:16:51+5:30
Delhi Red Fort Car Blast Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर हाफिद सईद भूमिगत, आता पुन्हा सक्रिय?

दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
Delhi Red Fort Car Blast Updates: दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर लष्कर-ए-तैयबा (LeT) चा दहशतवादी म्होरक्या हाफिज सईद चर्चेत आला आहे. स्फोटाच्या एक दिवस आधी लष्कर कमांडर सैफुल्लाहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सैफुल्लाह हाफिज सईदला 'गप्प बसू नका' असे आवाहन करताना दिसत होता. पण दिल्ली स्फोटाच्या तपासात आतापर्यंत LeT शी कोणताही संबंध आढळलेला नाही. तसे असले तरीही हाफिज सईदच्या लोकेशनचा म्हणजेच तो कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे तो पाकिस्तानशी संबंधित क्षेत्रात आहे.
हाफिज सईद सध्या कुठे लपून बसलाय?
एका व्हिडिओमध्ये लष्कर कमांडर सैफुल्लाह दावा करतो की हाफिज सईद गप्प बसणार नाही. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, हाफिज सईद कुठे आहे? ७७ वर्षीय दहशतवादी हाफिज सईद पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भूमिगत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हाफिजचा मुलगा तल्हा याचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या विधानात तल्हाने म्हटले आहे की भारतीय सैन्य हाफिज सईदला शोधतंय, पण तो सुरक्षित ठिकाणी आहे जिथे त्याच्यापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही.
लाहोरजवळ पुन्हा सक्रिय
हाफिज सईदने २ नोव्हेंबरला लाहोरमध्ये एक रॅली आयोजित केली होती, परंतु शेवटच्या क्षणी ती पुढे ढकलण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ लवकरच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये आयोजकांनी लवकरच रॅली आयोजित करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे हाफिज सईद पुन्हा एकदा पाकिस्तानातून आणि विशेषत: लाहोरभोवती सक्रिय असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
ऑपरेशन सिंदूरचा मोठा दणका
मे २०२५ मध्ये, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारताने अनेक लष्कर-ए-तैय्यबाच्या तळांवर हल्ला केला. मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाची मशीद पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबाचे सर्वाधिक नुकसान झाले. अशा परिस्थितीत आतातयीपणे हा हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे.