शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हे फीचर वापरून हॅकर्सनी हॅक केली फेसबुक अकाउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 9:00 AM

जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

वॉशिंग्टन- जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युजर्सचा डेटा वारंवार चोरीला जात असल्यानं फेसबुकच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक नवं नवे फीचर्स आणत असतो. अशाच एका फीचर्सच्या माध्यमातून हॅकर्सनी हा डेटा हॅक केला आहे. फेसबुक युजर्सना त्यांचं प्रोफाईल इतरांना कसं दिसतं हे पाहण्यासाठी 'View As' हे फिचर वापरलं जातं.हॅकर्सनी हल्ला करण्यासाठी या फीचर्समधील बगचा वापर केला. बग शोधून फेसबुकचे अॅक्सेस मिळवले आणि त्याच्या माध्यमातून अकाऊंट हॅक केली. टोकन अॅक्सेस या डिजिटल कीच्या मदतीनं फेसबुकचं अकाऊंट हे लॉग इन राहातं, त्यामुळे अकाऊंट सुरू करताना पुन्हा पासवर्डची गरज भासत नाही. त्याचाच फायदा घेत हॅकर्सनं ही अकाऊंट हॅक केली आहे. त्यामुळे फेसबुकनं तुम्हाला पासवर्ड न बदलता फक्त लॉग आऊट करून लॉग इन करण्याचा सल्ला दिला आहे. जगभरातल्या जवळपास 5 कोटी युजर्सना याचा फटका बसला आहे, परंतु देशागणिक आकडेवारी उपलब्ध नसल्याचे फेसबुकने आयर्लंडमधील डेटा नियामक संस्थेला माहिती दिली आहे.कंपनीने युजर्सना लॉग आऊट करून पुन्हा लॉग इन करण्यात सांगितले आहे. तसेच युजर्सनं पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा आमच्याकडून तपास सुरू आहे. हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटची माहिती चोरली का, त्याचा गैरवापर झाला का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही, असं कंपनीनं म्हणणं आहे. आमच्यासाठी युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे जे घडलं त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, असं म्हणत फेसबुकनं युजर्सची माफी मागितली आहे. 

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम