नागरिकत्वाच्या आदेशाला वाढता विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 07:58 IST2025-01-23T07:57:58+5:302025-01-23T07:58:32+5:30
United State News: अमेरिकेत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा नियम बदलण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला भारतीय-अमेरिकन सिनेटर्सनी विरोध केला आहे.

नागरिकत्वाच्या आदेशाला वाढता विरोध
वॉशिंग्टन - अमेरिकेत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा नियम बदलण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला भारतीय-अमेरिकन सिनेटर्सनी विरोध केला आहे.
भारतीय-अमेरिकन काँग्रेस सदस्य रो खन्ना म्हणाले, नागरिकत्व नियमात बदल केल्याने केवळ बेकायदा व कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांच्या नवजात बाळांवरच परिणाम होणार नाही तर एच-१बी व्हिसावर कायदेशीररीत्या जन्मलेल्यांवरही त्याचा परिणाम होईल. अन्य सदस्य श्री ठाणेदार म्हणाले की, हा देशाचा कायदा आहे आणि राहील. मी कोणत्याही परिस्थितीत त्याचे रक्षण करण्यासाठी लढेन.
४८ लाखांहून अधिक भारतीय अमेरिकेत
अमेरिकेच्या लोकसंख्येच्या १.५ टक्के भारतीय स्थलांतरित आहेत. अमेरिकेत ४८ लाखांहून अधिक भारतीय अमेरिकन समुदायाचे लोक वास्तव्याला आहेत. ट्रम्प यांच्या आदेशाला इमिग्रेशन हक्क गटांने कोर्टात आव्हान दिले आहे.