फाल्गुनी शाह यांना ग्रॅमी अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 08:17 IST2022-04-05T08:17:28+5:302022-04-05T08:17:41+5:30

Falguni Shah: भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांनी 'ए कलरफुल वर्ल्ड'या अल्बमसाठी मुलांसाठी उत्कृष्ट संगीत अल्बम या श्रेणीमध्ये यंदाचा ग्रॅमी अवॉर्ड मिळविला आहे.

Grammy Award to Falguni Shah | फाल्गुनी शाह यांना ग्रॅमी अवॉर्ड

फाल्गुनी शाह यांना ग्रॅमी अवॉर्ड

 नवी दिल्ली : भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांनी 'ए कलरफुल वर्ल्ड'या अल्बमसाठी मुलांसाठी उत्कृष्ट संगीत अल्बम या श्रेणीमध्ये यंदाचा ग्रॅमी अवॉर्ड मिळविला आहे. फाल्गुनी शाह या 'फालू' या नावाने प्रसिद्ध आहेत. स्वत: शाह यांनी इन्स्टाग्रामवर या पुरस्काराची माहिती दिली. ६४ वा ग्रॅमी अवॉर्डस समारंभ सोमवारी पहाटे लास वेगासमध्ये पार  पडला. 
शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजच्या जादूमय दिवसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ग्रॅमी प्रीमियरच्या उद्घाटन समारंभात आपली कला सादर करणे आणि 'ए कलरफुल वर्ल्ड'साठी काम केलेल्या सर्वांच्या वतीने अवॉर्ड घरी घेऊन जाणे हा मोठा सन्मान आहे. शाह यांनी पुरस्कार प्रदान झाल्याची छायाचित्रेही इन्स्टाग्रामवर दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Grammy Award to Falguni Shah