डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद

By देवेश फडके | Published: January 13, 2021 12:43 PM2021-01-13T12:43:17+5:302021-01-13T12:45:11+5:30

गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या २.७७ मिलियन आहे.

google suspends america president donald trump official youtube account | डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद

डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद

Next
ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत यूट्यूब अकाऊंट बंदगुगलकडून तात्पुरत्या स्वरुपाची कारवाईराजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यूट्यूबकडून कारवाई

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. धक्क्यांची ही मालिका सुरूच असून, फेसबुक, ट्विटरनंतर आता गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले आहे. 

यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. ट्रम्प यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात यूट्यूबने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट काढून टाकण्यात आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे. या चॅनेलवरून आता सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही, असे यूट्यूबने आपल्या पत्रकात म्हटले आहे. 

एवढेच नाही, तर ट्रम्प यांच्या चॅनेलचे कमेंट सेक्शनही बंद करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या २.७७ मिलियन आहे. सिव्हिल राइट ग्रुपकडून गुगलला डोनाल्ड ट्रम्प यांचा यूट्यूब अकाऊंट बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. असे न केल्यास यूट्यूबवर जागतिक स्तरावर बहिष्कार घालण्यात येईल, अशी धमकी सिव्हिल राइट ग्रुपने दिली होती, असा दावा करण्यात येत आहे. 

दरम्यान, ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर केले आहे. मात्र, यानंतर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ट्विटर अकाऊंट कायमचे बंद केले जाईल, असा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे. मात्र, फेसबुकने आपली कारवाई कायम ठेवली आहे. फेसबुककडूनही डोनाल्ड ट्रम्प यांचा अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन येथे डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून ही कारवाई केली जात आहे.

Web Title: google suspends america president donald trump official youtube account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.