शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

'गुगल'नं अफगाण सरकारचे ई-मेल अकाऊंट्स केले बंद; माजी अधिकाऱ्यांचा डाटा चोरी करु शकतं तालिबान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 13:23 IST

'गुगल'नं (Google) अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

'गुगल'नं (Google) अफगाण सरकारशी निगडीत अनेक ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. एकूण किती अकाऊंट्स बंद केले गेलेत याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पण अफगाणिस्तानाततालिबान्यांकडून अफगाण सरकारच्या माजी अधिकाऱ्यांच्या ई-मेल अकाऊंट्सचा गैरवापर केला जाऊ नये याची खबरदारी म्हणून गुगलनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 

धक्कादायक! तालिबान्यांनी गोळीबारानं केलेल्या सेलिब्रेशनमध्ये लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू 

तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक अफगाणी अधिकारी देश सोडून निघून गेले. यात अफगाणचे राष्ट्रपती अशरफ घनी यांचाही समावेश आहे. राष्ट्रपती घनी आणि अधिकारी देश सोडून निघून गेले असले तरी त्यांचे ई-मेल अकाऊंट्स तालिबान्यांच्या हाती लागू नयेत यासाठी गुगलनं सरकारशी निगडीत व्यक्तींचे सर्व ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. 

भारतातील  मुस्लिमांसंदर्भात तालिबानचं मोठं वक्तव्य, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यकांची करून दिली आठवण

अफगाणिस्तानातील ज्या नागरिकांनी अमेरिकेला आणि अफगाण सरकारला मदत केली अशांचा शोध घेऊन तालिबानकडून त्यांना मारण्यात येत असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेला मदत करणाऱ्या अफगाणी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून सर्व अफगाण अधिकाऱ्यांचे ई-मेल अकाऊंट्स बंद केले आहेत. 

'गुगल'नं काय म्हटलं?सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही काही अकाऊंट्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करत आहोत, असं गुगलनं स्पष्ट केलं आहे. पण हे अकाऊंट्स कायमस्वरुपी बंद करण्याबाबतची कोणतीही स्पष्टता गुगलकडून देण्यात आलेली नाही. "तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही अफगाणिस्तानातील परिस्थितीची माहिती घेत आहोत. आणि ई-मेल अकाऊंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी काही अकाऊंट्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलेली आहेत. अफगाणिस्तान सरकारच्या एका अधिकाऱ्यानं तालिबानकडून ई-मेल अकाऊंट्सचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी तक्रार दिली आहे. त्यानुसारच काही अकाऊंट्स बंद करण्यात आली आहेत", असं गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानgoogleगुगलTalibanतालिबान