भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:42 IST2025-04-30T14:42:07+5:302025-04-30T14:42:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात व्हाइट हाऊसचा दौरा केला होता...

'Good news' came from America as India-Pakistan tensions reached their peak Trump said, deal with India can be made | भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार

भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत- पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच, भारतासाठी अमेरिकेतून एक चांगली बातमी आली आहे. भारतासोबत शुल्कासंदर्भातील चर्चा अत्यंत उत्तम पद्धथीने सुरू आहे आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होऊन जाईल, असे आपल्याला वाटते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी व्हाइट हाऊस बाहेर पत्रकारांसोबत बोलत होते.

ट्रम्प म्हणाले, 'आपला भारतासोबत करार होईल, असे मला वाटते. यासंदर्भात, सीएनबीसी न्यूजने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हवाल्याने म्हटले आह की, पंतप्रधान मोदी यांचीही करार करण्याची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात व्हाइट हाऊसचा दौरा केला होता. तत्पूर्वी, प्रत्युत्तरात्मक शुल्क टाळण्यासाठी अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम रूप देणाऱ्या पहिल्या देशांत सामील होईल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसें म्हणालेह होते. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधन आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनसह अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तरात्मक कर लादण्याची घोषणा केली होती. तथापि, ९ एप्रिल रोजी त्यांनी याच वर्षी ९ जुलैपर्यंत या शुल्काला ९० दिवसांची स्थगिती दिली केली, चीन आणि हाँगकाँग वगळता सुमारे ७५ देशांनी व्यापार करारांसाठी अमेरिकेशी संपर्क साधला होता.

गेल्या दोन दिवसांपूर्वी देशांना लावण्यात आलेल्या १० टक्के मुलभूत शुल्क अद्याप लागू आहे. याशिवाय, स्टिल, अॅल्युमीनियम आणि मोटर वाहन आंदींच्या घटकांवर अथवा वस्तूंवर 25 टक्के शुल्कही आहे. दुसरीकडे, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धादरम्यान, अनेक चिनी कंपन्यांनी भारतीय निर्यातदारांशी संपर्क साधला आहे. 

Web Title: 'Good news' came from America as India-Pakistan tensions reached their peak Trump said, deal with India can be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.