शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! देशात सर्वसाधारण ९६ टक्के पावसाचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:53 IST

भारतीय हवामान विभागाने आज शेतकरी आणि सर्वासामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.

ठळक मुद्दे४९ टक्के कमी पावसाची शक्यता : हवामान विभागाचा पहिला दीर्घकालीन पूर्वानुमान जाहीरप्रमुख पाच घटकांचा विचार करुन या मॉडेलनुसार अंदाज व्यक्त देशाचा सरासरी पाऊस हा ८९ सेंटीमीटर

पुणे : भारतीय हवामान विभागाने आज शेतकरी आणि सर्वासामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे़. त्यात ५ टक्के कमी अथवा अधिक फरक गृहीत धरला आहे़. त्याचवेळी ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची १७ टक्के शक्यता असून ९० ते ९६ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पावसाची ३२ टक्के शक्यता वर्तविली आहे़ अर्थात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ही ४९ टक्के इतकी असणार आहे़. मॉन्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतो़ मॉन्सून कसा होईल, यावर भारतातील बाजारपेठेतील चढउतार अवलंबून असल्याने शेतकऱ्यांसह उद्योग जगताचेही भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात येणाऱ्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष असते़. आचारसंहिता असल्याने निवडणुक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर भारतीय हवामान विभागाने आपला पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर केला़. त्यात त्यांनी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी संपूर्ण देशासाठी सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला आहे़. त्यात ५ टक्के कमी अथवा अधिक फरक गृहित धरला आहे़. हा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागरातील डिसेंबर, जानेवारीचे तापमान, दक्षिण भारतीय महासागरातील समुद्राचे फेब्रुवारीतील तापमान, पूर्व अशिया समुद्र सागरी स्तरावरील फेब्रुवारी-मार्चचा दबाव, उत्तर पश्चिमी यूरोप जमीन पृष्ठभागावरील हवेचे जानेवारीमधील तापमान व विषृववृत्तावरील पॅसिफिक गरम पाण्याचे फेब्रुवारी-मार्चचे तापमा या प्रमुख पाच घटकांचा विचार करुन या मॉडेलनुसार अंदाज व्यक्त केला जातो़. एलनिनोविषयी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहे़. सध्या एलनिनो हा कमजोर पडला असून त्याची स्थिती मॉन्सूनच्या काळात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे़. हिंदी महासागरातील स्थिती स्थिर असून मॉन्सूनचा काळात ती अनुकुल होत जाण्याची शक्यता आहे़. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने २०१९ मधील मॉन्सून हा देशभरासाठी दीर्घकालावधीसाठी सर्वसाधारण राहणार असून सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे़. देशाचा सरासरी पाऊस हा ८९ सेंटीमीटर आहे़. त्याचवेळी त्यांनी कमी पाऊस होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे़. सरासरीपेक्षा ४९ टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता या अंदाजात व्यक्त केली आहे़.  

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी