शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

'आमची जहाजे पाठवतो, डिझेल द्या हो...!', इराणच्या सवलतीनंतर पाकिस्तानची कुवैतसमोर विनवणी; होर्मुझचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:36 IST

Kuwait Pakistan Diesel Jet Fuel Supply : अमेरिका-इराण युद्धाच्या तणावात पाकिस्तानला इराणकडून मोठी सवलत मिळाली आहे. आता कुवैतकडून डिझेल आणि जेट इंधन आणण्यासाठी पाकिस्तान सज्ज झाला आहे.

जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला इराणकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अंशतः बंद केली असली, तरी पाकिस्तानच्या २० जहाजांना या मार्गावरून जाण्याची विशेष सवलत दिली आहे. या संधीचा फायदा घेत पाकिस्तानने आता कुवैतकडे डिझेल आणि जेट इंधनासाठी साकडे घातले आहे.

पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी कुवैतच्या राजदूतांशी चर्चा केली. "इराणने आमची जहाजं सोडण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला इंधन द्या, आम्ही आमची जहाजं पाठवून ते घेऊन येऊ," अशी विनंती पाकिस्तानने केली. यावर कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सहमती दर्शवली असून, पाकिस्तानला डिझेल आणि जेट इंधन पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.

इराणची नवी रणनीती - 'टोल' वसुली?एकडे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या रिपोर्टनुसार, इराण या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर 'टोल' लावण्याच्या तयारीत आहे. तसेच, अमेरिका, इस्रायल आणि इराणवर निर्बंध लादणाऱ्या देशांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्यास पूर्णपणे बंदी घातली जाऊ शकते.

भारतावर काय परिणाम?होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा सर्वाधिक फटका भारतालाही बसला होता, कारण भारताची ९०% एलपीजी आयात याच मार्गावरून होते. मात्र, काही आठवड्यांपूर्वी इराणने भारताच्या 'नंदा देवी' आणि 'शिवालिक' यांसारख्या जहाजांना सोडले होते, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतील गॅस टंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Concession: Pakistan Pleads with Kuwait for Diesel, Hormuz Strait Opens

Web Summary : Pakistan, granted Hormuz Strait access by Iran, seeks diesel from Kuwait. Iran considers tolls on ships, potentially impacting nations with sanctions. India's LPG imports benefited recently.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPakistanपाकिस्तानFuel Crisisइंधन टंचाईCrude Oilखनिज तेल