शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मला पुन्हा एकदा संधी द्या; झुकेरबर्गचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 09:44 IST

केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरातून फेसबुकवर मोठी टीका होत आहे.

वॉशिंग्टन: 'मला पुन्हा एकदा संधी द्या. फेसबुक चालवण्यासाठी मी अजूनही समर्थ आहे,' अशा शब्दांमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने त्याच्या भावना व्यक्त केल्या. केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरातून फेसबुकवर मोठी टीका होत आहे. वापरकर्त्यांची माहिती लिक केल्यामुळे फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी झुकेरबर्गने पत्रकार परिषद घेतली.'फेसबुककडून झालेल्या डेटा लिकची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी मी स्वीकारतो,' असे झुकेरबर्गने पत्रकार परिषदेत म्हटले. वापरकर्त्यांची माहिती इतक्या मोठ्या प्रमाणात लिक झाल्यानंतरही फेसबुकचे नेतृत्व करण्यासाठी तुम्ही स्वत:ला सक्षम समजता का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी त्याला विचारला. या प्रश्नाला त्याने होकारार्थी उत्तर दिले. फेसबुकवरील ८ कोटी ७० लाख लोकांची माहिती लिक झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश वापरकर्ते हे अमेरिकेतील आहेत. मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या, अशी विनंती झुकेरबर्गने पत्रकार परिषदेत बोलताना केली. 'माझी चूक खूप मोठी आहे. मी पूर्णपणे माझ्या चुकीची जबाबदारी स्वीकारतो. मात्र चुकांमधूनच माणसे शिकत असतात. फेसबुककडून झालेल्या चुकीची जबाबदारी सर्वप्रथम मीच पुढे येऊन स्वीकारली. या संपूर्ण प्रकरणात मी कमी पडलो, हे मी मान्य केले होते,' असे झुकेरबर्गने म्हटले. या प्रकरणामुळे फेसबुकच्या संचालक पदावरुन कोणाचीही हकालपट्टी झालेली नाही, असेही झुकेरबर्गने स्पष्ट केले. 'मी फेसबुकची सुरुवात केली. इथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मीच जबाबदार आहे. त्यामुळे ज्या काही चुका झाल्या, त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. या चुकीबद्दल कोणालाही कंपनीतून काढण्यात आलेले नाही. मात्र आजही मी फेसबुक अतिशय समर्थपणे सांभाळू शकतो,' असे त्याने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.  

टॅग्स :FacebookफेसबुकCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग