'ग्रीनलँड अमेरिकेला द्या, नाहीतर टॅक्स भरा!'; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवला 'टॅरिफ'चा धाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:13 IST2026-01-17T09:12:20+5:302026-01-17T09:13:40+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

'Give Greenland to America, or pay taxes!'; Donald Trump shows the world the threat of 'tariffs' | 'ग्रीनलँड अमेरिकेला द्या, नाहीतर टॅक्स भरा!'; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवला 'टॅरिफ'चा धाक

'ग्रीनलँड अमेरिकेला द्या, नाहीतर टॅक्स भरा!'; डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दाखवला 'टॅरिफ'चा धाक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. "ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असायलाच हवे, आणि जे देश याला विरोध करतील त्यांच्यावर मी प्रचंड टॅरिफ लादण्यास मागेपुढे पाहणार नाही," असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा असणे ही आता केवळ इच्छा नसून गरज बनल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

ग्रीनलँडसाठी 'टॅरिफ'चे अस्त्र

व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ट्रम्प यांनी आपल्या जुन्या रणनीतीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "ज्याप्रमाणे मी युरोपीय देशांना औषधांवर टॅरिफ लावण्याची धमकी देऊन वठणीवर आणले होते, तोच प्रयोग मी ग्रीनलँडसाठीही करू शकतो. जर एखादा देश ग्रीनलँडच्या मुद्द्यावर सहकार्य करणार नसेल, तर त्यांना आर्थिक दंड सोसावा लागेल." ग्रीनलँड हा सध्या डेन्मार्कच्या अखत्यारीतील एक अर्ध-स्वायत्त प्रदेश आहे, परंतु ट्रम्प यांनी त्यावर पूर्ण अमेरिकन वर्चस्व असण्याचा आग्रह धरला आहे.

रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला उत्तर

आर्क्टिक महासागरात रशिया आणि चीन आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहेत. याला शह देण्यासाठी ग्रीनलँड हा अमेरिकेसाठी संरक्षणात्मक कवच ठरू शकतो, असा ट्रम्प यांचा दावा आहे. त्यांनी डेन्मार्ककडे हा प्रदेश विकत घेण्याची मागणी केली होती, जी डेन्मार्क आणि नाटो देशांनी फेटाळून लावली आहे. मात्र, ट्रम्प यांनी आपला हेका सोडलेला नाही. "नाटो या विषयावर आमच्याशी चर्चा करत आहे, कारण ग्रीनलँडशिवाय आमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते," असेही त्यांनी स्पष्ट केले.

लष्करी ताकदीचे प्रदर्शन

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी व्हेनेझुएला आणि इराणमधील अमेरिकन लष्करी कारवायांचा दाखला दिला. "आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. इराणच्या अण्वस्त्र क्षमतेचा नाश करून आम्ही हे सिद्ध केले आहे. ग्रीनलँड हा आमच्या 'गोल्डन डोम' (संरक्षण यंत्रणा) आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे," असे सांगत त्यांनी लष्करी बळाचा वापर करण्याचे सूचक संकेत दिले.

रशियाची टीका: पाश्चात्य नियमांचे अपयश

दुसरीकडे, रशियाने ट्रम्प यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी म्हटले की, "ग्रीनलँडवरून निर्माण झालेला तणाव हा पाश्चात्य देशांच्या तथाकथित 'नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या' अपयशाचा पुरावा आहे. डेन्मार्कने अमेरिकेसमोर घेतलेली शरणागती ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे."

Web Title : ग्रीनलैंड पर ट्रंप का करारा प्रहार; दुनिया को दिखाया टैरिफ का डर

Web Summary : ट्रंप ने ग्रीनलैंड की मांग की, विरोध करने वालों पर टैरिफ की धमकी दी। रूस और चीन के खिलाफ इसकी रणनीतिक अहमियत पर जोर दिया। डेनमार्क ने खरीद प्रस्ताव ठुकराया। रूस ने पश्चिमी व्यवस्था को विफल बताया।

Web Title : Trump Threatens Tariffs Over Greenland; Shows 'Tariff' Power to World

Web Summary : Trump demands Greenland, threatening tariffs on opposing nations. He emphasizes its strategic importance against Russia and China. Denmark rejected his purchase offer. Russia criticizes Western order failure.