शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 10:52 IST

युरोपात सध्या खाद्यतेलाची टंचाई सुरू आहे. त्यातही सूर्यफुलाच्या तेलाची.

रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे केवळ त्या दोन देशांमधील असलं तरी त्याचे परिणाम, पडसाद आणि झळा साऱ्या जगाला बसल्या. अर्थात आजच्या काळात संपूर्ण जगच एकमेकांवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असताना कोणतंही युद्ध हे फक्त त्या दोन देशांपुरतं कधीच राहत नाही. या युद्धातही साऱ्या जगानं याचा अनुभव घेतला. युद्धाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे अनेक देशांत खाद्यतेल प्रचंड महाग झालं, खाद्यतेलाचा तुटवडा तिथे भासू लागला. इतका की, अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपले व्यवसाय तात्पुरते का होईना, बंदच करावे लागले; कारण खाद्यतेलच नाही, तर पदार्थ बनवणार कसे? घरगुती पातळीवरही खाद्यतेलाची टंचाई लोकांना जाणवलीच; पण त्यांना चढ्या दरानं का होईना, आपल्या स्वयंपाकघराची गरज भागेल एवढं खाद्यतेल मिळतंय; पण हॉटेल व्यावसायिकांना ज्या प्रमाणात आणि जितकं खाद्यतेल लागतं, तितक्या तेलाचा पुरवठा त्यांना होणं शक्यच नाही. 

युरोपात सध्या खाद्यतेलाची टंचाई सुरू आहे. त्यातही सूर्यफुलाच्या तेलाची. युरोपात खाण्यासाठी इतर कोणत्याही तेलापेक्षा सूर्यफुलाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रशिया-युक्रेन युद्धच या खाद्यतेलाच्या टंचाईलाही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. कारण संपूर्ण जगात हे दोन देशच सूर्यफुलाच्या तेलाचे सर्वांत मोठे उत्पादक आहेत. युद्ध सुरू असल्यामुळे या तेलाची निर्मिती, उत्पादन आणि वितरण या सर्वच गोष्टींवर अनेक बंधने आली आहेत. अनेकजण खाद्यतेलाच्या या टंचाईवर उपाय शोधत आहेत. जर्मनीच्या एका पबनं मात्र यावर इतका अनोखा उपाय शोधला, की अक्षरश: काही दिवसांत त्यांच्याकडच्या खाद्यतेलाची टंचाई संपली आणि त्यांच्याकडे तेलाचा पुरेसा साठा निर्माण झाला. आपलं किचन बंद करण्याची त्यांच्यावरची वेळही टळली.

असं केलं तरी काय या पबनं? 

या पबनं लोकांना जाहीर आवाहन केलं, तुम्हाला बिअर पाहिजे असेल, तर आमच्याकडे या. जितकी पाहिजे तितकी बिअर घ्या. त्यासाठी एक छदामही मोजू नका. एक गोष्ट फक्त करा, सूर्यफुलाच्या तेलाच्या बाटल्या आम्हाला द्या. तुम्ही एक लीटर तेलाची बाटली आम्हाला दिली, तर एक लीटर बिअरची बाटली आमच्याकडून तुम्हाला ‘फुकट’ मिळेल! ‘जिसिंजर ब्रेवरी’ असं या पबचं नाव आहे. त्यांच्या या ऑफरला लोकांनी भरभरून दाद दिली. लोकांनी आपल्या जिभेला जरा लगाम लावला; पण स्वयंपाकघरातलं तेल आपापल्या बाटल्यांत भरून ते या पबकडे पोहोचले. पबनंही त्यांना या तेलाच्या बदल्यात बिअरच्या बाटल्या पुरवल्या. दोघांसाठीही हा फायद्याचा सौदा होता; कारण पबला तेल मिळणं मुश्कील झालं होतं, तर लोकांच्या दृष्टीनं हा खरोखरच फायद्याचा सौदा होता; कारण सूर्यफुलाच्या खाद्यतेलाची एक लीटरची बाटली त्यांना साडेचार युरोमध्ये पडत होती, तर एक लीटर बिअरसाठी त्यांना सात ते आठ युरो मोजावे लागत होते. दुसऱ्या अर्थानं विचार केला तर साडेचार युरोच्या बदल्यात त्यांना आठ युरो मिळत होते! अनेकांसाठी हा ‘जॅकपॉट’च होता. त्यामुळे लोकांनी आपल्याकडच्या खाद्यतेलावर पाणी सोडायची तयारी दाखवताना, त्या बदल्यात बिअरच्या बाटल्या घेण्याला पसंती दिली. जर्मनीतील एक ‘सामाजिक कार्यकर्ता’ आणि बिअरप्रेमी तर फारच अफलातून निघाला. त्यानं जी शक्कल लढवली, त्यानं तर अनेकांच्या मेंदूला मुंग्या आल्या. हा कार्यकर्ता रशिया आणि युक्रेन युद्धामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी युक्रेनमध्ये गेला होता. तिथल्या लोकांना त्यानं आपल्याकडून शक्य ती मदत केली; पण युक्रेनहून परत येताना मात्र तो ऐंशी लीटर सूर्यफुलाचं तेल घेऊन आला. हे खाद्यतेल त्यानं या पबला नेऊन दिलं आणि त्याबदल्यात बिअरच्या बाटल्या मिळवल्या. मोरिझ बॉलर असं या ‘हिकमती’ माणसाचं नाव आहे. याच बाटल्यांच्या माध्यमातून त्यानं आपला वाढदिवस जंगी साजरा केला आणि आपल्या मित्रमंडळींना खुश  करून टाकलं! 

८० टक्के तेलाचा पुरवठा! रशिया आणि युक्रेनमध्ये किती प्रमाणात खाद्यतेल निर्माण होत असावं? एका अंदाजानुसार, युद्ध सुरू होण्यापूर्वी जवळपास ८० टक्के खाद्यतेलाचा पुरवठा या दोन देशांमधूनच जगाला केला जात होता; पण युद्ध सुरू होताच तेलाच्या पुरवठ्यावर गंडांतर आलं. हे तेल युरोपात पोहोचणं मुश्कील झालं आणि लोकांच्या स्वयंपाकघरातलं तेल आटू लागलं.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प