शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

सेल्फीच्या नादात मैत्रिणीला रेल्वेची धडक, मुली तरीही सेल्फी काढण्यात मग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:07 IST

वेगवान रेल्वेसमोर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात एक मुलगी ब्रेन डॅमेजच्या उंबऱ्यावर उभी आहे. मुलीला अपघात झाला तरीही मैत्रिणी सेल्फी घेण्यात मग्न होत्या.

ठळक मुद्देफोटो काढण्यासाठी इली हायती ही १६ वर्षांची तरुणी सगळ्यात मागे उभी राहिली. मागून वेगवान ट्रेन आल्याने वाऱ्याच्या झटक्याने ती खालीच कोसळली .एवढं सगळं होऊनही तिच्या मैत्रिणी हसत-खेळत सेल्फी काढण्यातच मश्गुल होत्या.

इंडोनेशिया : जगभरात सेल्फी काढण्याच्या नादात कित्येकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जिवावर बेतेल अशा ठिकाणी सेल्फी न काढण्याचे आवाहन वारंवार केले जाते. पण लोकं या सगळ्याकडे काना-डोळा करतात आणि शेवटी गोष्ट त्यांच्याच जीवावर बेतते. सेल्फी काढताना पाय घसरल्याने नदीत बुडणं, फेसबुक लाईव्ह करताना बोट अचानक पाण्यात बुडणं, अशा अनेक दुर्घटना घडल्याचं आपण ऐकलं आहे. म्हणूनच सेल्फी काढताना सावध राहा असं सांगण्यात येतं. पण मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी तरुणाईने ऐकल्या हे तसं दुर्मिळच. 

इंडोनेशियात असाच एक प्रकार समोर आलाय. सेल्फी काढताना ट्रेनने एका मुलीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली, मात्र तिच्या मैत्रिणी तरीही सेल्फी काढण्यात मग्न होत्या.  डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील सेंट्रल जावा प्रोव्हिन्समधील रेल्वे रुळांवर काही मुली जमल्या होत्या. त्यांना जरा हटके सेल्फी काढायचा होता. त्यामुळे त्यांना धावत्या ट्रेनसमोर फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

फोटो काढण्यासाठी इली हायती ही १६ वर्षांची तरुणी सगळ्यात मागे उभी राहिली. मागून ट्रेन आल्याने वाऱ्याच्या झटक्याने ती खालीच कोसळली आणि तिच्या डोक्याला जबर जखम झाली. हा सगळा प्रकार घडला तरीही तिच्या मैत्रिणी हसत-खेळत सेल्फी काढण्यातच मश्गुल होत्या. त्यांना थोड्यावेळाने हा सगळा प्रकार लक्षात  आला. तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिच्या डोक्यावर जबर जखम झाल्याने टाके पडले आहेत. डॉक्टरांनी अथक प्रयत्नाने तिचा जीव वाचवला असला तरीही तिचा कायमचा ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. 

आणखी वाचा - असंवेदनशीलतेचा कळस! बेशुद्ध महिलेसोबत पादचारी सेल्फी काढण्यात मग्न

तिला झालेली जखम ट्रेनच्या धडकेमुळे झाली आहे  की ट्रेनच्या हवेच्या झोतात खाली पडल्यावर दगडाला आपटल्याने झाली आहे हे अद्यापही कळू शकलेलं नाही. पोलिसांचे पथक याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

मात्र जर या एवढ्याशा गोष्टीमुळे तिचा ब्रेन डॅमेज झाला तर स्वत:च्या अल्लडपणामुळेच तिनं तिचं आयुष्य धोक्यात घातलं असंच म्हणावं लागेल. म्हणूनच तुम्हीही सेल्फी काढताना जरा सावधानता  बाळगा असंच सगळ्यांकडून सांगण्यात येतंय. 

आणखी वाचा - सेल्फीने घेतला जीव, नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSelfieसेल्फीInternationalआंतरराष्ट्रीय