शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी विश्वासमत गमावले, देशातील आघाडी सरकार कोसळले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 23:42 IST

Germany News: जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी सोमवारी जर्मन संसदेमध्ये विश्वासमत गमावले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले असून, देशात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात मतदान होण्याची शक्यता वाढली आहे.

जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी सोमवारी जर्मन संसदेमध्ये विश्वासमत गमावले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले असून, देशात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात मतदान होण्याची शक्यता वाढली आहे. चांसलर ओलाफ शोल्ज यांना ७३३ सदस्य असलेल्या कनिष्ठ सभागृह किंवा बुंडेस्टेगमध्ये २०७ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. तर ३९४ जणांनी त्यांच्याविरोधात मतदान केलं. तर ११६ खासदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे सभागृहामधील बहुमताचा आकडा असलेल्या ३६७ पासून शोल्ज हे दूर राहिले. ओलाफ शोल्ज यांनी जर्मनीच्या स्थिर अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित करण्याच्या पद्धतीवरून निर्माण झालेल्या वादानंतर वित्तमंत्र्यांना बरखास्त केले होते. त्यानंतर मागच्या महिन्यात ६ नोव्हेंबर रोजी तीन पक्षीय आघाडी मोडली होती.

दरम्यान, जर्मनीमधील अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मुदतीपूर्वी सात महिने आधी  २३ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक घेण्यास सहमती दर्शवली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची राज्यघटना बुंडेस्टेगला भंग करण्याची परवानगी देत नाही. त्यामुले शोल्ज यांना विश्वासमत मिळं आवश्यक होते.  आता संसद विसर्जिक करावी की नाही, तसेच निवडणुका घ्याव्यात की नाही याचा निर्णय घेण्याची जबाबदारी ही राष्ट्रपती फ्रँक वाल्टर स्टीनमियर यांच्यावर आहे. त्यांच्याकडे हा निर्णय घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत आहे. तसेच संसद विसर्जित झाल्यास ६० दिवसांच्या आत निवडणुका होणं आवश्यक असेल.  

एकंदरीत घटनाक्रमांवरून युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला पुढच्या वर्षी अचानक निवडणुकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमुळे जर्मनीमध्ये सर्वसाधारणपणे आघाड्यांचं सरकार बनतं. तसेच त्याचं नेतृत्व साधारणपणे सीडीयू/सीएसयू किंवा एसपीडी करतात. २०२१ पासून शोल्ज यांची एसपीडीने उदारमतवादी फ्री डेमोक्रॅटिक पार्टी आणि ग्रीन पार्टी यांच्यासोबत मिळून एक आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. मात्र आता हे सरकार कोसळलं आहे. 

टॅग्स :Germanyजर्मनीInternationalआंतरराष्ट्रीय