शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 15:30 IST

अमेरिकेच्या भारतातील राजदुतांनी मागितली माफी; पोलिसांकडून शोध सुरू

वॉशिंग्टन: पोलिसांच्या ताब्यात असताना मृत पावलेल्या जॉर्ज फ्लॉएड यांना न्याय मिळावा यासाठी अमेरिकेत अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये काही आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली. फ्लॉएड यांच्या मारेकरी पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी वॉशिंग्टनमध्ये गेल्या काही दिवसांपासून 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान काहींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं नुकसान केलं. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेबद्दल भारतातील अमेरिकेच्या राजदुतांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी या प्रकाराबद्दल माफीदेखील मागितली. जॉर्ज फ्लॉएड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत आंदोलनांनी जोर धरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राजधानीत मोठ्या प्रमाणात नॅशनल गार्ड्स तैनात केले आहेत. व्हाईट हाऊस परिसरातील आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचं ट्रम्प यांनी समर्थन केल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वॉशिंग्टनमधल्या कारवाईनंतर संपूर्ण देशासमोर एक उदाहरण असेल, असं ट्रम्प यांनी म्हटल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. वर्चस्व कायम ठेवणारं सुरक्षा दल गरजेचं असल्याचं ट्रम्प म्हणाले. देशातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्याची आवश्यकता आहे. ट्रम्प यांनी देशभरातील आंदोलनांसाठी अप्रत्यक्षपणे डेमोक्रॅटिक पक्षाला जबाबदार धरलं. ज्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष सत्तेत नाही. तिथे डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं. कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणारलॉकडाऊनमध्ये काय चुकलं? राहुल गांधींशी चर्चेदरम्यान राजीव बजाज यांनी नेमकं कारण सांगितलंकेरळमध्ये आणखी एका हत्तीची हत्या?; फटाक्यांचाच वापर केल्याचा संशय

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीAmericaअमेरिका