France Gen-Z Protest: काही दिवसापूर्वी नेपाळमध्ये Gen-Z ने सोशल मिडिया बंदी विरोधात मोठे आंदोलन केले. हे आंदोलन हिंसक झाले. यामुळे ओली सरकार बरखास्त करावे लागले. आता नेपाळनंतर फ्रान्समध्ये Gen-Z ने मोठे आंदोलन सुरू केले आहे. लीमामध्ये अनेकांनी भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि पेन्शन सुधारणांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. मोठ्या जमावाने गोंधळ सुरू केला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या आणि गॅसचा वापर केला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
पेरूच्या राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्टे यांच्या सरकारविरोधात Gen-Z ने आंदोलन पुकारले होते, या आंदोलनामुळे सरकारला तरुणांच्या उद्रेकाचा सामना करावा लागत आहे. शहरात सुमारे ५०० लोक मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमले होते.
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
आंदोलकांची मागणी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका आंदोलकाने म्हटले की, "आज लोकशाही पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. ती आणखी वाईट होत चालली आहे. हे भीतीमुळे, खंडणीमुळे आहे." काँग्रेसकडे जनादेश नसल्याने त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
अनेक अधिकारी जखमी
लिमामध्ये आंदोलकांनी कार्यकारी आणि काँग्रेसच्या इमारतींमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्ष सुरू झाला. पोलिसांच्या मते, या संघर्षात किमान तीन अधिकारी जखमी झाले.
या आठवड्यात मंजूर झालेल्या कायद्यानुसार, तरुणांना खाजगी पेन्शन फंडात सामील होणे आवश्यक असेल, जरी त्यांच्यापैकी अनेकांना अस्थिर कामाच्या वातावरणाचा सामना करावा लागत असला तरी.