शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 00:55 IST

बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध लवकरात लवकर संपवण्यास आणि अब्राहम करारांचा विस्तार करण्यास सहमती दर्शविली आहे.

मध्यपूर्वेतील तणाव आता शांत होण्याच्या मार्गावर आहे. येथील आणखी एक युद्ध लवकरच संपुष्टात येणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा युद्ध संपवण्यास सहमती दर्शविली आहे. बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध लवकरात लवकर संपवण्यास आणि अब्राहम करारांचा विस्तार करण्यास सहमती दर्शविली आहे.

हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? -टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले गाझा युद्ध दोन आठवड्यांत संपवण्यासंदर्भात ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी फोनवरून चर्चा करत सहमती दर्शविली आहे. महत्वाचे म्हणजे, यानंतर इस्रायलच्या नेतृत्वाखाली युएई आणि इजिप्तच्या सहकार्याने गाझामध्ये सरकार चालवले जाईल," असा दावाही संबंधित वृत्तात करण्यात आला आहे.

हमास गटाच्या नेत्यांना देशातून बाहेर काढले जाईल - हमास समूहाच्या नेत्यांना देशातून बाहेर काढले जाईल आणि सर्व बंदीवाणांना मुक्त केले जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजरायलचे पंतप्रधान पीएम बेंजामिन नेतन्याहू यांच्यात सोमवारी (23 जून 2025) चर्चा झाली. संबंधित वृत्तानुसार,  सौदी अरेबिया-सीरिया इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करतील आणि इतर मुस्लिम देशही असेच करतील.

50 हजारहून अधिक जणांचा मृत्यू - हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला होता. यानंतर, इस्रायलने गाझामध्ये लष्करी कारवाई सुरू केली. जी अद्यापही सुरूच आहे. यासंदर्भात, गाझामध्ये युद्धविरामासाठी आपण नव्याने प्रयत्न करू,असे कतारने मंगळवारी (२४ जून २०२५) म्हटले होते. दरम्यान, इस्रायलच्या लष्करी कारवाईत आतापर्यंत किमान ५६,१५६ लोक मारले गेले असल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPalestineपॅलेस्टाइनIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध