युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 05:39 IST2025-10-01T05:38:50+5:302025-10-01T05:39:04+5:30
गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
न्यूयॉर्क वॉशिंग्टन : गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकेचे मित्र व संबंधित देशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर आम्ही जी २० कलमी योजना जाहीर केली ती सर्वांना आवडली आहे. असेही टम्प म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हे न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या युएन महासभेच्या ८०व्या अधिवेशनासाठी उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी मुनीर यांना ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित केले होते. ते बैठकीत पहिल्यापासून इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, मी ज्या देशांशी बैठका घेतल्या, चर्चा केल्या, त्यामध्ये सौदी अरेबियासह पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्करप्रमुख पहिल्यापासून सहभागी झाले होते.
या देशांचा पाठिंबा
१ गाझा संघर्ष संपविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या २० कलमी योजनेचे सौदी अरेबिया, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्कस्थान, कतार आणि इजिप्त या देशांनी स्वागत केले.
ट्रम्प यांचा प्रस्ताव, गाझाची पुनर्बांधणी, पॅलेस्टिनी नागरिकांचे विस्थापन टाळणे आदी मुद्द्यांबद्दल या देशांनी समाधान व्यक्त केले.