भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:18 IST2025-07-29T09:16:52+5:302025-07-29T09:18:11+5:30

इस्रायलने मदत थांबवल्यापासून उपासमारीने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४७ झाली आहे, ज्यात ८८ लहान मुलं आहेत.

gaza hunger crisis children starvation israel | भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात

भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात

गाझामध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. सोमवारी गाझा आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझा पट्टीत पॅलेस्टिनी लोकांना उपाशी ठेवल्याने गेल्या २४ तासांत एका बाळासह किमान १४ जणांचा मृत्यू झाला. इस्रायलने मदत थांबवल्यापासून उपासमारीने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४७ झाली आहे, ज्यात ८८ लहान मुलं आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, इस्रायलच्या ब्लॉकएडमुळे ४० हजार लहान मुलांचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मार्चपासून इस्रायलने सर्व प्रकारचं अन्न आणि मदत उपाशी असलेल्या पॅलेस्टिनी लोकांपर्यंत पोहोचण्यास बंदी घातली आहे. सोमवारी सकाळी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नवजात बाळ मोहम्मद इब्राहिम अदास देखील होता. उपासमारीच्या या परिस्थितीमुळे इस्रायल समर्थक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिंता वाढल्या आहेत. ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे.

गाझाच्या युद्धग्रस्त अल-शिफा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अदासच्या मृत्यूची घोषणा केली आणि म्हटलं की त्याचा मृत्यू गंभीर कुपोषण आणि शिशु फॉर्म्युलाअभावी झाला. अल-शिफा रुग्णालयाचे संचालक मुहम्मद अबू सलमिया यांनी असा इशारा दिला की, हजारो लोकांचा अशाच प्रकारे मृत्यू होऊ शकतो. अबू सलमिया यांनी अल जजीराला सांगितलं की, "गाझा पट्टीतील सर्व भाग उपासमारीच्या गंभीर टप्प्यावर पोहोचला असल्याने आम्ही मृत्यूंमध्ये वेगाने वाढ होण्याचा इशारा देत आहोत."

उपासमारीने मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना, जगभरात इस्रायलच्या निर्बंधांना विरोध देखील वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी गाझावरील आपली भूमिका बदलली, मानवतावादी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि इस्रायली नेते नेतन्याहू यांना मदत पाठविण्याचं आवाहन केलं कारण तेथील लहान मुलांचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.

Web Title: gaza hunger crisis children starvation israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.