अमेरिकेच्या निवडणुकीत ‘कचरा’ पेटला; डोनाल्ड ट्रम्प झाले आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:21 IST2024-11-01T11:20:29+5:302024-11-01T11:21:28+5:30
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांच्या समर्थकांना ‘कचरा’ संबोधले होते. हाच मुद्दा उपस्थित करीत ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना ‘तुमचा खेळ आता संपला आहे’, असा इशारा दिला, तर याकडे दुर्लक्ष करीत कमला यांनी प्रचारातून हा मुद्दा मुद्दाम दूर ठेवला आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीत ‘कचरा’ पेटला; डोनाल्ड ट्रम्प झाले आक्रमक
फिलाडेल्फिया : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पाच दिवसांवर आली असताना विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही उमेदवार प्रचारात आक्रमक झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांच्या समर्थकांना ‘कचरा’ संबोधले होते. हाच मुद्दा उपस्थित करीत ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना ‘तुमचा खेळ आता संपला आहे’, असा इशारा दिला, तर याकडे दुर्लक्ष करीत कमला यांनी प्रचारातून हा मुद्दा मुद्दाम दूर ठेवला आहे.
ट्रम्प आले कचरा गाडीतून
बायडेन यांनी ट्रम्प समर्थकांना कचरा संबोधल्यानंतर व्हिस्कॉन्सिनच्या ग्रीन बे भागात ट्रम्प हे चक्क कचरा वेचक कर्मचाऱ्यांचे जॅकेट घालून कचरागाडीतून जाहीर सभास्थळी आले. याची बरीच चर्चा झाली.
हॅरिस यांनी केले दुर्लक्ष
ट्रम्प यांच्याकडे कमला म्हणाल्या, कुणाचे काही मत असेल, तर ते जोडून माझ्यावर टीका करणे योग्य नाही. माझे समर्थक असोत वा विरोधक, मला सर्वच अमेरिकी लोकांचे प्रतिनिधित्व करावयाचे आहे.