शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

'अमेरिकन संसदे'समोर मराठीजनांनी साकारला बाप्पा, 36 वर्षांची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 9:58 PM

गणेशोत्सवाची धूम गेल्या 8 दिवसांपासून देशभरात दिसून येत आहे. मात्र, साता समुद्रापारही बाप्पांचे तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जात आहे.

शारलट- गणेशोत्सवाची धूम गेल्या 8 दिवसांपासून देशभरात दिसून येत आहे. मात्र, साता समुद्रापारही बाप्पांचे तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जात आहे. अमेरिकेतील शारलोट येथील गणेशत्सावाला 36 वर्षांची परंपरा आहे. येथील शारलट मराठी मंडळाकडून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. शारलटमध्ये आप्पा आणि गीता जोशी यांनी 36 वर्षांपूर्वी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अमेरिकेत गणरायाला विराजमान केलं. यंदा शारलटमधील या गणपती बाप्पांना चक्क अमेरिकन संसंदेसमोर विराजमान करण्यात आले आहे. 

अमेरिकेत गेल्यानंतर तरुण पिढी आपले सण, उत्सव आणि परंपरा विसरून जाते. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव या तरुणाईवर पडतो, अशी नेहमीच ओरड होते. मात्र, अमेरिकेतही आम्ही साता आपल्या परंपरा आणि सण उत्सव तितक्यात आनंदाने आणि उत्साहात साजरे करतो. दिवळी आणि गणेशोत्वाची धूम आम्ही येथेही अनुभवतो, असे शारलोट मराठी मंडळातील ट्रस्टी राहुल गरड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच लोकमान्य टिळकांचा उद्देश केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेतही साध्य होताना दिसतो, असेही ते म्हणाले. कारण, स्वातंत्र्य लढ्यात नागरिकांनी एकत्र यावे आणि चवळवळीला बळ मिळावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केली. पण, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने आम्ही भारतीय अमेरिकेत एकत्र येतो. आता, लढा स्वातंत्र्याचा नसला तरी आपल्या परंपरा जपण्याचा आणि देशप्रेम व्यक्त करण्याचा आहे. त्यासाठी येथील मराठी माणसांचा नेहमीच आग्रह असतो, असेही राहुल गरड यांनी म्हटले. यंदाच्या गणपती उभारण्यासाठी चक्क अमेरिकन संसंदेचा देखावा येथील मंडळाने सादर केला आहे. अमेरिकन संसदेसोर बाप्पा विराजमान झाल्याचे आपणास पाहायला मिळते.

  शारलट मराठी गणेश मंडळाच्या या 5 दिवसीय गणेशोत्सवात जवळपास 5 ते 7 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ येतात. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना येथील मराठीजनांनी एकत्र येऊन या शारलट मराठी मंडळाची स्थापना केली आहे. गणेशोतस्वाच्या 5 दिवसांच्या कार्यकाळात ढोल-ताशांचा गजर येथे पाहायला मिळतो. गणपती बाप्पाची आरती, पूजा आणि मराठी सेलिब्रिटींचेही कार्यक्रम घेतले जातात. तसेच गणेशोत्सवकाळात विविध स्पर्धांचे आयोजनही केलं जाते. तर मंडळाचे स्वत:चे ढोल पथक असून अखेरच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात गणारायाला भक्तिभावाने निरोपही दिला जातो. 

गणेश कमिटी : महेश भोर, अमोल तळप, पांडुरंग नाईक, मनिषा नाईक.शार्लट मराठी मंडळ ट्रस्टी : संदीप पाध्ये, राहुल गरड आणि दिपक वेताळ

सॉफ्टवेअर इंजिनिअर अमितने बनवली आकर्षक गणेशमूर्ती  शारलट गणेश मंडळातील गणेश मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. तर या आकर्षक मूर्तीबद्दल अनेकांकडून विचारणाही केली जात आहे. मात्र, ही मूर्ती या मंडळाचे सदस्य आणि मूळचे नागपूरचे रहिवासी असलेल्या अमित कोलुरवार यांनी स्वत:च्या हातांनी बनविली आहे. मातीचा उपयोग करुन इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविल्यानंतर, सुंदर रंगात या मूर्तीला आकर्षक बनवले आहे. या मूर्तीचे संदुर-देखणे रूप पाहून गणेशभक्त नक्कीच तिच्या प्रेमात पडतील. विशेष म्हणजे अमेरिकेत गणेशमूर्ती मिळणे खूप कठीण आहे. त्यामुळे व्यावसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अमित यांच्या कलात्मक हातांनी ही गणेशमूर्ती साकारण्यात आली. अमित यांचे वडिल रमेश कोलूरवार हे मूर्तीकार आहेत, त्यामुळे लहानपणपासूनच अमित यांनी मूर्तीकला शिकली होती. विशेष म्हणजे अमिरेकत लठ्ठ पगाराची नोकरी असतानाही आपला इतिहास आणि मूर्तीकला ते विसरले नाहीत हे विशेष. 

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवganpatiगणपतीAmericaअमेरिका