शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पुण्यातील मानाच्या गणपतीचा बहरीनमध्ये गजर, साई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला दगडूशेठचा बाप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 12:58 IST

बहरीनच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने गणेशोत्सव मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरा केला.

गणेशोत्सव देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. साता समुद्रापारही बाप्पांची तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही बहरीनच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने गणेशोत्सव मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरा केला. बहरीनमधील १० ते १२ हजार लोकांनी गणेशोत्सवास हजेरी लावून आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले.

बहरीन येथील गणेशोत्सवाला ४० वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक मराठी मंडळाकडून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने आपल्या गणपती बाप्पांसाठी शिर्डीमधील साई बाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र मंडळाची स्वतः ची गणपती डेकॉरेटीवची टीम असून दरवर्षी १ महिना अगोदरपासून ही टीम सजावटीच्या कामाला सुरुवात करते. दररोज २-३ तास ऑफिस कामकाजानंतर हे लोक गणरायाच्या सेवेसाठी हजार होतात. या वर्षी या टीमने तयार केलेला सुंदर देखावा मुंबई, पुण्यामधील नामांकित देखाव्यांना लाजवेल असाच होता. बहरीनमधील सर्व भारतीय नागरिकांनी देखाव्याचे भरपूर कौतुक केले.

भारताबाहेर गेल्यानंतर तरुण पिढी आपले सण, उत्सव आणि परंपरा विसरून जाते. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव या तरुणाईवर पडतो अशी नेहमीच ओरड होते. मात्र, भारताबाहेर आम्ही आपल्या परंपरा आणि सण उत्सव तितक्यात आनंदाने आणि उत्साहात साजरे करतो. दिवाळी आणि गणेशोत्सवाची धूम आम्ही येथेही अनुभवतो, असे महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अभिजीत इगावे यांनी सांगितले. 

बहरीनमधील महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ दरवर्षी ४० हून अधिक मराठी व नॉन-मराठी उत्सव, सण साजरे करते. मंडळाचं स्वतः चं ढोल पथक असून अखेरच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला भक्तिभावाने निरोपही दिला जातो. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवास बहरीनमधील फक्त मराठीच नाही तर उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील लोकही मनोभावे सहभागी होतात. या वर्षी मंडळाने दगडूशेठ गणपतीची आकर्षक मूर्ती स्थापन केली होती. या मूर्तीचे सुंदर-देखणे रूप पाहून गणेशभक्त मूर्तीच्या प्रेमात पडले. गणरायाला निरोप देताना लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव गणराया पुढच्या वर्षी लवकर या हेच सांगत होता. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सव