Ganesh Chaturthi 2018 : थायलंडमध्येही 'गणपती बाप्पा मोरया', जाणून घ्या येथील बाप्पांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 10:55 PM2018-09-13T22:55:08+5:302018-09-13T22:58:54+5:30

Ganesh Chaturthi 2018: देशभरात गणपती उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर घराघरात आणि मनामनात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.

Ganesh Chaturthi 2018: 'Ganapati Bappa Morya' in Thailand also, know the name of the Ganesha | Ganesh Chaturthi 2018 : थायलंडमध्येही 'गणपती बाप्पा मोरया', जाणून घ्या येथील बाप्पांचे नाव

Ganesh Chaturthi 2018 : थायलंडमध्येही 'गणपती बाप्पा मोरया', जाणून घ्या येथील बाप्पांचे नाव

googlenewsNext

मुंबई - देशभरात गणपती उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर घराघरात आणि मनामनात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, केवळ भारतातच नाही, तर थायलंडमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. थायलंडमध्ये गणपतीली फ्र फ्रिकानेत (Phra Phikanet) किंवा फ्र फिकानेसौन (Phra Phikanesuan) म्हटले जाते. थायलंडमध्ये गणपतीला भविष्य तसेच कला, शिक्षण आणि व्यापाराशी संबंधित देवता म्हणून पुजले जाते. थायलंडमधील ललित कला विभागाच्या संकेतस्थळावर देखील गणेश दिसतो.

देशभरात वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. घरोघरी बाप्पांची आरास उभारण्यात आली. तर, गणेश मंडळांनीही ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आजचा दिवस केवळ आपल्या बाप्पासाठीच होता. त्यामुळेच गणपतीच्या मूर्तीच्या आगमनापासून ते पूजा-आरती आणि सजावटीपर्यंत मंडळातील कार्यकर्ते मग्न झाल्याचे दिसून आले. देशातील गणेशभक्तांचा जसा उत्साह आहे, तसाच देशाबाहेरही गणपतीची स्थापना करणाऱ्यां गणेभक्तांमध्ये उत्साह दिसून येतो. थायलंडमध्येही तेथील स्थानिक नागरिकांकडून गणपतीची प्राण-प्रतिष्ठा करण्यात आली आहे. थायलंडला गेलेल्या एका मराठी नेटीझन्सने आपल्या फेसबुकवरुन थायलंडमध्ये बसविण्यात आलेल्या गणपतीचे छायाचित्र अपलोड केले आहे. तेथेही गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन करतात. तर तेथे असलेल्या भारतीय नागरिकांकडूनही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

दरम्यान, थायलंडमध्ये मोठमोठ्या दूरचित्र वाहिन्या आणि उत्पादन कंपन्यासमोर देखील गणेश मुर्ती आहेत. काही चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो यांची शूटिंग सुरू करताना गणेश पूजा केली जाते. थाई बौद्ध हे गणपती तसेच इतर भारतीय देवदेवतांचा देखील आदर करतात.

Web Title: Ganesh Chaturthi 2018: 'Ganapati Bappa Morya' in Thailand also, know the name of the Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.