G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 20:54 IST2025-11-22T20:47:00+5:302025-11-22T20:54:42+5:30
शिखर परिषदेत हवामान बदलावर ऐतिहासिक घोषणा; दक्षिण आफ्रिकेचा डोनाल्ड ट्रम्पंना कडक संदेश

G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
G20 Summit: दक्षिण आफ्रिकेत आयोजित G20 शिखर परिषदेत सहभागी देशांनी हवामान बदलावर ऐतिहासिक संयुक्त घोषणापत्र पारित केले आहे. विशेष म्हणजे, या घोषणापत्राला अमेरिकेचा विरोध आणि परिषदेतून बहिष्कार असूनही G20 सदस्य देशांनी सर्वानुमते मंजुरी दिली. यामुळे या निर्णयाला ‘परंपरेला छेद देणारे’ असे म्हटले जात आहे.
अमेरिकेचा बहिष्कार अन् दक्षिण आफ्रिकेसोबतचे राजनैतिक मतभेद
अमेरिकेने जोहान्सबर्ग परिषदेत सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. रॉयटर्सच्या अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी सांगितले की, अमेरिका संयुक्त घोषणापत्रातील काही शब्दांवर आक्षेप घेत होता. रामफोसा म्हणाले, “हवामान बदलावरील घोषणापत्र पुन्हा चर्चेसाठी आता उघडू शकत नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावाला अधोरेखित केले आहे.
शिखर परिषद सुरू होताच घोषणापत्राला मंजुरी
सामान्यतः G20 चे घोषणापत्र बैठकीच्या शेवटी पारित केले जाते. मात्र, या वेळी परंपरा मोडत शिखर परिषद सुरू होताच घोषणापत्र एकमताने स्वीकारण्यात आले. राष्ट्राध्यक्ष रामफोसा यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, या घोषणापत्रासंदर्भात व्यापक सहमती आहे, त्यामुळे शिखर परिषद सुरू होताच ते स्वीकारले पाहिजे. त्यांचे प्रवक्ते विन्सेंट मॅग्वेन्या यांनी सांगितले की, घोषणापत्राला शिखर परिषदेच्या सुरुवातीला मंजुरी देणे हा असामान्य निर्णय होता, परंतु याला मिळालेल्या जबरदस्त पाठिंब्यामुळे हे संभव झाले.
ट्रम्प सरकारचा दबाव, पण दक्षिण आफ्रिकेचा नकार
दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अनुपस्थितीत G20 चे संयुक्त घोषणापत्र स्वीकारू नका, असा दबाव टाकलो हात. पण दक्षिण आफ्रिकेने हा दबाव न मानता हवामान बदलावरील जागतिक सहमतीला प्राधान्य दिले.