निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 05:31 IST2025-06-23T05:30:35+5:302025-06-23T05:31:30+5:30

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हा निर्णय लागू होईल. ९६ मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी २१ मैल रुंद आहे.

Fuel crisis for half the world? Iran to close Strait of Hormuz; Proposal approved | निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर

निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली/तेहरान : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने तेलपुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे व  दरवाढीचे संकट येऊ शकते.
 
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हा निर्णय लागू होईल. ९६ मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी २१ मैल रुंद आहे. ही होर्मुझची सामुद्रधुनी ओमानचे आखात, अरबी समुद्र यांना जोडते. येथूनच जहाजे पुन्हा हिंदी महासागराकडे वळतात. पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधनतेलाचे सध्या असलेले ७५ डॉलर प्रति बॅरल हे दर थेट १२० ते १३० डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

भारताला चिंता नाही

भारताकडे सध्या अनेक आठवडे पुरेल इतका तेल आणि गॅसचा साठा असून विविध मार्गांनी भारत कच्च्या तेलाची आयात करण्यास सक्षम आहे, असे देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी रात्री सांगितले.

सिरियात आत्मघाती बॉम्बस्फोट, १३ ठार

दमिश्क : सिरियामधील दमिश्क येथील एका गर्दीने खचाखच भरलेल्या चर्चमध्ये रविवारी आत्मघाती बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून ५३ लोक जखमी झाले. मृतकांत काही लहान मुलांचाही समावेश आहे. घटना घडली त्यावेळी लोक प्रार्थना करीत होते. एका आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला स्फोटकांनी उडवले. अद्याप कुणीही घटनेची जबाबदारी घेतलेली नाही.
 

Web Title: Fuel crisis for half the world? Iran to close Strait of Hormuz; Proposal approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.