इराणवर-अमेरिका संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. जर अमेरिकेने हल्ला केला तर ते युद्ध मानले जाईल, असे इराणचे म्हणणे आहे. दरम्यान, चीनकडून जे इनपूट येत आहेत, त्यानुसार, असे दिसून येते की, चीन इराणचे खुले समर्थन करणार नाही. तज्ज्ञांच्या मते, चीनने हस्तक्षेप केल्यास, त्याचे व्हेनेझुएलापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते.
थेट युद्ध टाळण्यावर चीनचा भर -शांघाय इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ वेन शाओबियाओ यांच्या मते, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे हे चीनच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे चीन केवळ राजनैतिक विधाने आणि आर्थिक सहकार्यापुरता मर्यादित राहील. चीन या प्रकरणावर शांतपणे लक्ष ठेवून स्वतःला कोणत्याही संघर्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल.
शरणार्थी संकटाची भीती - इराणमध्ये गृहयुद्ध आणि सत्तापालटाची परिस्थिती निर्माण झाल्यास, मोठ्या प्रमाणावर शरणार्थी संकट निर्माण होऊ शकते. यामुळे मध्यपूर्वेतील स्थिरता धोक्यात येईल. याचा थेट परिणाम चीनच्या व्यापार आणि गुंतवणुकीवर होईल. अशा परिस्थितीत चीनला दीर्घकाळ प्रशासकीय आव्हानांचा सामनाही करावा लागू शकतो.
अमेरिकेशी थेट संघर्ष करण्याची चीनची इच्छा नाही - नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे रिसर्च फेलो जीन-लूप समां यांच्या मते, इराणला पाठिंबा देणे म्हणजे अमेरिका किंवा इस्रायलशी थेट शत्रुत्व पत्करणे होय. यामुळे अशा स्थितीत अडकण्याची चीनची इच्छा नाही. यामुळे तो केवळ चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यावर भर देईल.
इराणला पाठिंबा देणे बंधनकारक नाही -चीन आणि इराणमध्ये कोणताही अधिकृत लष्करी करार नाही, यामुळे इराणला मदत करणे चीनला बंधनकारक नाही. तसेच, इराणचा जवळचा मित्र असलेल्या रशियाची सामरिक शक्ती कमकुवत होत असल्याने चीन स्वतःला या युद्धात झोकून देण्यास तयार नाही.
Web Summary : Amid US-Iran tensions, China likely won't openly back Iran due to its foreign policy of non-interference and fears of refugee crisis impacting its trade. Direct conflict with the US and lack of military pact also deter China.
Web Summary : ईरान-अमेरिका तनाव के बीच, चीन खुले तौर पर ईरान का समर्थन नहीं करेगा क्योंकि उसकी विदेश नीति हस्तक्षेप न करने की है और उसे शरणार्थी संकट का डर है जिससे उसके व्यापार पर असर पड़ेगा। अमेरिका के साथ सीधा टकराव और सैन्य समझौता न होना भी चीन को रोकता है।