शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला म्हटलं 'डिलिशियस'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 6:37 PM

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहेत. ऑस्ट्रेलियात इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं जंगी स्वागतही करण्यात आलंय.

कॅनबेरा- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहेत. ऑस्ट्रेलियात इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं जंगी स्वागतही करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मेल्कम टर्नबुल यांनी स्वतः इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पाहुणचार केला असून, मेल्कम टर्नबुल यांनी केलेला पाहुणचार पाहून इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली.तसेच पत्रकार परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मेल्कम टर्नबुल आणि त्यांच्या पत्नीचं विशेष कौतुक केलं. परंतु त्याच वेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मेल्कम टर्नबुल यांच्या पत्नीला डिलिशियस असं संबोधलं. इमॅन्युएल मॅक्रॉन टर्नबुल यांना उद्देशून म्हणाले, मी या आदरातिथ्य आणि पाहुणचारासाठी तुमचं आणि तुमच्या डिलिशियस पत्नीचे विशेष आभार मानू इच्छितो. मॅक्रॉन यांनी टर्नबुल यांची पत्नी लूसी यांना डिलिशियस म्हटल्यानं सिडनीतल्या लोकांच्या भुवया उंचावल्या.काहींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी ते अनवधानानं बोलून गेल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावरही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विधानाच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर त्यांनी यावर खुलासा केली आहे. मला डिलिशयस नव्हे, तर फ्रेंच शब्दानुसार डिलिशिया म्हणायचं होतं. फ्रेंचमध्ये डिलिशियाचा अर्थ मनोहर असा आहे, असंही स्पष्टीकरण इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलं आहे. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलिया