शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स'हृदय' भारत! पाकिस्तानी हॉकीपटूच्या शरीरात धडकणार भारतीय हृदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 11:02 IST

पाकिस्तानचा विश्वविजेता हॉकीपटू आणि भारताविरोधात नेहमीच चांगली कामगिरी करणारा गोलरक्षक मन्सूर अहमद याच्या शरीरात लवकरच एक भारतीय हृदय धडकणार आहे.

मुंबई - पाकिस्तानचा विश्वविजेता हॉकीपटू आणि भारताविरोधात नेहमीच चांगली कामगिरी करणारा गोलरक्षक मन्सूर अहमद याच्या शरीरात लवकरच एक भारतीय हृदय धडकणार आहे. पाकिस्तानचा हा 49 वर्षांचा हॉकीपटू हृदयरोगाने पीडित असून,  त्याला हृदय प्रत्यारोपनाची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्याला उपचारांसाठी वैद्यकीय व्हिसा मिळावा, असे आवाहन भारत सरकारला केले होते. आता फोर्टिस ग्रुप हॉस्पिटलने त्याला मुंबई आणि चेन्नई येथे हृदय प्रत्यारोपण आणि मोफत उपचार देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.मन्सूर सध्या कराची येथील जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेत आहे. त्याला हृदयात असलेल्या पेसमेकर आणि स्टेंटबाबत त्रास होत आहे. मात्र, ''आपल्याला आर्थिक मदतीची गरज नाही. तर केवळ उपचारांसाठी भारताचा वैद्यकीय व्हिसा मिळावा,'' असे मन्सून अहमदने म्हटले आहे. अहमद याला डॉक्टर चौधरी परवेझ यांनी भारतात उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. अहमद आणि त्याच्या डॉक्टरांना पाकिस्तानी नागरिकांना उपचारांसाठी भारताकडून सहानुभूतीपूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे. अहमदच्या हृदय प्रत्यारोपणासाठी आम्ही मुंबई आणि चेन्ई येथे नोंदणी करणार आहोत.भारत सरकारकडून अहमद याला भारतात येण्याची परवानगी मिळाल्यानंतर या प्रवासासाठी तो या प्रवासासाठी तंदुरुस्त आहे याची आम्ही चाचपणी करू, असे फोर्टिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मन्सूर अहमद याने 1986 ते 2000 या काळात पाकिस्तानकडून 338 सामने खेळले होते. तसेच 1994 साली पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.   

टॅग्स :HockeyहॉकीPakistanपाकिस्तानIndiaभारतHealthआरोग्य