शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
2
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
3
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
5
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
6
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
7
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
8
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
9
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
10
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
11
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
12
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
13
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
14
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
15
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
16
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
17
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
18
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
19
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
20
Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर
Daily Top 2Weekly Top 5

२०२६ च्या ऑस्करसाठी ‘कांतारा : चॅप्टर १’, ‘तन्वी द ग्रेट’सह चार भारतीय चित्रपट पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:09 IST

ॲकॅडमीने ९८ व्या ऑस्करसाठीची ‘रिमाइंडर लिस्ट’ प्रसिद्ध केली.

लॉस एंजेलिस : कन्नड ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा : अ लिजेंड - चॅप्टर १’ आणि हिंदी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ यांसह चार भारतीय चित्रपट २०२६ च्या ऑस्कर मधील ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ श्रेणीत स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ‘ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने घोषित केलेल्या २०१ पात्र चित्रपटांच्या यादीत हे चित्रपट आहेत. 

ॲकॅडमीने गुरुवारी ९८ व्या ऑस्करसाठीची ‘रिमाइंडर लिस्ट’ प्रसिद्ध केली. २२ जानेवारी रोजी अधिकृत नामांकने जाहीर होणार आहेत. यात सर्वसाधारण श्रेणी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी निकष पूर्ण करणाऱ्या चित्रपटांचा समावेश असतो. 

पात्र ठरलेले भारतीय चित्रपट

कांतारा’, ‘तन्वी द ग्रेट’, महावतार नरसिंहा (बहुभाषिक ॲनिमेटेड चित्रपट), टूरिस्ट फॅमिली (तमिळ चित्रपट), ‘सिस्टर मिडनाइट’ (हिंदी चित्रपट)

‘होमबाउंड’ला टक्कर मिळेल?

ॲकॅडमीने ‘इंटरनॅशनल फिचर फिल्म’सह १२ श्रेणींसाठी आपली ‘शॉर्टलिस्ट’ जाहीर केली होती.  भारताची अधिकृत एन्ट्री असलेल्या नीरज घायवान यांच्या ‘होमबाउंड’ या चित्रपटाने १५ चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. हा सोहळा १५ मार्च रोजी आहे. 

ऑस्करचे निवडीचे निकष आणि प्रक्रिया

९८ व्या ऑस्करसाठी एकूण ३१७ चित्रपट पात्र आहेत, त्यापैकी २०१ चित्रपटांनी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ श्रेणीसाठीचे निकष पूर्ण केले आहेत.

या यादीत नाव असणे म्हणजे नामांकन मिळणे नव्हे; अंतिम नामांकनासाठी या चित्रपटांना ॲकॅडमीच्या मतदान प्रक्रियेतून जावे लागेल.

पात्रतेसाठी, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान अमेरिकेतील प्रमुख सहा शहरांपैकी किमान एका शहरात चित्रपट  प्रदर्शित होणे आणि सलग सात दिवस चालणे अनिवार्य आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Four Indian Films Qualify for 2026 Oscars' Best Picture Category

Web Summary : ‘Kantara: Chapter 1’ and ‘Tanvi the Great,’ among four Indian films, are eligible for the 2026 Oscars' Best Picture category. 201 films meet requirements. Nominations will be announced January 22nd. 'Homebound' is shortlisted for 'International Feature Film'.
टॅग्स :Oscarऑस्करOscar nominationsऑस्कर नामांकनेKantara MovieकांताराTollywoodTollywoodbollywoodबॉलिवूड