शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

अभिमानास्पद! इस्रोच्या माजी संचालकांना फ्रान्सकडून सर्वोच्च नागरी सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:09 PM

अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा फ्रान्सकडून गौरव

नवी दिल्ली: इस्रोचे माजी संचालक ए. एस. किरण कुमार यांचा फ्रान्सनं सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान केला आहे. 'शेवेलियर डी लॉर्ड नेशनल डी ला लिगियन डी ऑनर' नावानं हा सन्मान ओळखला जातो. भारत आणि फ्रान्समधील अंतराळ सहकार्य वाढवण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल कुमार यांचा गौरव करण्यात आला. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीनं फ्रान्सचे भारतातले राजदूत ऍलेक्झांडर जिगलर यांनी कुमार यांना सन्मानित केलं. दोन देशांमधील अंतराळ तंत्रज्ञानाला नवा आयाम दिल्याबद्दल कुमार यांचा सन्मान केल्याचं फ्रान्सची अंतराळ संशोधन संस्था सीएनईएसचे संचालक जीन येव्स ले गाल यांनी सांगितलं. भारत आणि फ्रान्सनं अंतराळ संशोधनातलं सहकार्य वाढवण्यासाठी कुमार यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचे कौतुकाद्गार त्यांनी काढले. 'किरण कुमार यांनी केलेली कामगिरी सोपी नव्हती. 2015 ते 2018 या काळात इस्रोचं संचालक म्हणून काम करताना त्यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली. भारत आणि फ्रान्स यांच्यातलं अंतराळ सहकार्य एका वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,' अशा शब्दांत ले गाल यांनी फ्रान्सच्या वतीनं कुमार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'शेवेलियर डी लॉर्ड नेशनल डी ला लिगियन डी ऑनर' पुरस्काराला खूप मोठा इतिहास आहे. 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. फ्रान्सशिवाय इतर देशांच्या नागरिकांनादेखील या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.  

टॅग्स :isroइस्रोFranceफ्रान्स