इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 22:28 IST2020-02-25T20:46:53+5:302020-02-25T22:28:42+5:30
इजिप्तवर तीन दशकांवर अधिक काळ शासन करणारे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं मंगळवारी 91व्या वर्षी निधन झालं आहे.

इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं निधन
काहिरा- इजिप्तवर तीन दशकांवर अधिक काळ शासन करणारे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांचं मंगळवारी 91व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांना मध्य-पूर्वे (Middle-East) स्थिरता आणण्यासाठी विशेष काम केलं आहे. इजिप्तच्या सरकारी चॅनेलनुसार, होस्नी मुबारक यांनी देशात 18 दिवस चालणाऱ्या विरोध प्रदर्शनानंतर 11 फेब्रुवारी 2011ला राजीनामा दिला होता. लोकशाहीच्या समर्थकांनी केलेल्या प्रदर्शनानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते.
होस्नी मुबारक यांनी तीन दशकांच्या शासनकाळात इजिप्त आणि अमेरिकेमध्ये चांगले संबंध प्रस्थापित केले होते. त्यांनी इस्लामी दहशतवादालाही विरोध केला होता. तसेच त्यांच्या सत्तेत असताना इजिप्त आणि इस्रायलचेही चांगले संबंध होते. होस्नी मुबारक यांच्याविरोधात तरुणांनी विरोध प्रदर्शन केलं आहे. तरुणींनी विरोधासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर केला होता. होस्नी मुबारक यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथल्या लष्करानं सत्ता ताब्यात घेतली होती. होस्नी मुबारक आणि माजी सुरक्षा प्रमुख यांच्यावर जून 2012मध्ये झालेल्या प्रदर्शनादरम्यान 900 हत्यांमध्ये दोषी धरलं होतं. त्यामुळे त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.