चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 18:36 IST2018-01-08T18:36:34+5:302018-01-08T18:36:42+5:30

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे आज निधन झाले. 2003 ते 2013 अशा दहा वर्षांच्या काळात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. जिंताओ हे 75 वर्षांचे होते. 

Former Chinese President Hu Jintao passed away | चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे निधन

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे निधन

बीजिंग - चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांचे आज निधन झाले. 2003 ते 2013 अशा दहा वर्षांच्या काळात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. जिंताओ हे 75 वर्षांचे होते. 
21 डिसेंबर 1942 रोजी जन्मलेल्या जिंताओ यांनी  1998 ते 2003 या काळात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 2002 मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढे 2003 साली मार्च महिन्यात जिंताओ यांनी जियांग जेमिन यांच्याकडून चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.   

Web Title: Former Chinese President Hu Jintao passed away