शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अफगाणिस्तान सोडण्यासाठी मुलींचे बळजबरीने लग्न, रिपोर्टमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 18:16 IST

Afghanistan Crisis: देश सोडण्यासाठी महिलांना सर्वात जास्त अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

काबुल:अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा केल्यानंतर शेकडो-हजारो अफगाणी नागरिक जीव मुठीत घेऊन देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नात अनेकांना यश आलंय, तर काहींना अपयश. या दरम्यान काही जणांचा मृत्यूही झालाय. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही प्रचंड व्हायरल होताहेत. यात सर्वात जास्त अडचण येतीय अफगाणिस्तानातील तरुणींना. एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील अनेक तरुणांना देश सोडून जाण्यासाठी बळजबरीने लग्न करावं लागत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाणी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अफगाणी नागरिकांना तालिबानच्या आधीच्या शासनाचा अनुभव असल्यामुळे आता परत त्यांना तालिबानी शासनात राहण्याची इच्छा नाही. यासाठी मिळेल त्या विमानाने अफगाणिस्तान सोडून कुठल्याही देशात जाण्यासाठी विमानतळावर प्रचंड गर्दी होत आहे. यात देश सोडताना महिलांना सर्वात जास्त अडचणींना सामोरे जावं लागत आहे. 

एका रिपोर्टनुसार, काबुल विमानतळावर देश सोडण्यासाठी मुलींचे जबरदस्तीने लग्न लावले जात आहे. तसेच, काही महिला परपुरुषांना त्यांचे पती असल्याचे सांगत विमानात प्रवेश मिळवत आहेत. या घटना प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून यूएईला गेलेल्या आणि तेथून अमेरिकेला जाणाऱ्या महिलांसोबत घडत आहेत. याशिवाय काही पालक आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी पुरुषांना पैसे देऊन आपल्या मुलींचे लग्न त्यांच्यासोबत लावून देत आहेत. अमेरिकाचा परराष्ट्र विभाग या प्रकरणी संयुक्त अरब अमिरातीमधील आपल्या अधिकार्‍यांची मदत घेऊन अमेरिकेत पोहोचलेल्या अशा काही महिलांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान