शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
3
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
4
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
5
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
7
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
8
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
9
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
10
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
11
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
12
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
13
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
14
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
15
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
16
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
17
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
18
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
19
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
20
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!

‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:57 IST

पाकिस्तानातील १८ वर्षीय मिनेल्ले फारुकी या तरुणीनं तिथं नुकताच एक इतिहास घडवला आहे. पाकिस्तानातील सर्वांत कमी वयाची ती युवा कमर्शिअल पायलट बनली आहे.

पाकिस्तान हा एक असा देश आहे, जिथून चांगली बातमी कधी अपवादानंच मिळते. अन्यथा तिथे कायम खून, हाणामाऱ्या, दहशतवाद, कर्जाच्या डोंगरात बुडालेला देश, भिकेला लागलेले नागरिक, खाण्या-पिण्याची चिंता, हताश झालेले नागरिक, इतर देशांनी, लष्करानं केलेली कुरघोडी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिलेली तंबी... अशा नकारात्मक बातम्यांनीच हा देश कायम गाजत असतो.पण तिथून नुकतीच एक चांगली बातमी आली आहे, तीही दहशतवाद आणि राजकारणापलीकडची. सर्वसामान्य नागरिकांना त्यातल्या त्यात सुखावणारी. पाकिस्तानातील १८ वर्षीय मिनेल्ले फारुकी या तरुणीनं तिथं नुकताच एक इतिहास घडवला आहे. पाकिस्तानातील सर्वांत कमी वयाची ती युवा कमर्शिअल पायलट बनली आहे. पाकिस्तानसाठी ही बातमी खरंच आशादायक आणि अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. पाकिस्तान हा आधीच पारंपरिक, पुरुषसत्ताक संस्कृती असलेला देश. तेथील महिलांवर खूप बंधनं आहेत. शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत आणि महिलांच्या चालण्या-बोलण्याबाबत असलेल्या सामाजिक संकेतांबाबत. अशा परिस्थितीत तेथील एक तरुण मुलगी देशातील सर्वांत युवा पायलट बनते ही गोष्ट त्यांच्यासाठी खरंच महत्त्वाची. सुदैवानं मिनेल्लेच्या पालकांनीही तिचे पंख कापले नाहीत आणि तिला आपल्या मनाप्रमाणे स्वच्छंद जगू दिलं. त्याचाच परिपाक म्हणजे तिचं हे यश. आपण आकाशात विहार करावा, उंचच उंच उडावं हे लहानपणापासूनच मिनेल्लेचं स्वप्न. विमानतळापासून जवळच राहत असल्यानं ती रोज विमानं उडताना आणि लँड होताना पाहायची. विमानाचा आवाज आला, आकाशात विमान दिसलं की आपोआप तिची नजर वर जायची. कोणतंही विमान, मग ते आकाशात उड्डाण घेणारं असो किंवा जमिनीवर लँड होणारं असो, जोपर्यंत ते नजरेआड होत नाही, तोपर्यंत ती त्या विमानाकडे पाहत राहायची. एक दिवस आपणही असंच विमानात बसून उडायचं आणि विमान चालवायचं ही तिची इच्छा त्याचवेळी मनात ठाण मांडून बसली. त्यामुळे ती स्वत:हूनच विमानांचा अभ्यास करायला लागली. त्यानंतर रीतसर तिनं विमान उड्डाणाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यासाठी तिच्या घरच्यांनी तिला कोणतीही आडकाठी केली नाही, हे तर तिचं सुदैवच; पण तिचा हा प्रवास सुखेनैव झाला असं नाही. पालकांनी जरी नाही, तरी समाजानं, नातेवाइकांनी, आजूबाजूच्या लोकांनी तिच्या या हवाई स्वप्नांना सुरुंग लावायचा प्रयत्न केलाच. तिच्या आई-वडिलांनाही त्यावरून सतत ऐकावं लागलं. ‘मुलगी असूनही ही थेरं कशासाठी? सर्वसामान्य मुली जे, जितकं आणि जसं शिक्षण घेतात तसं घ्यायला काय झालं? मुलीच्या जातीला असं शोभत नाही, वगैरे, वगैरे.. पण ना तिच्या आई-वडिलांनी या टोमण्यांकडे लक्ष दिलं, ना स्वत: मिनेल्लेनं अशा सल्ल्यांना भीक घातली.. उलट याबाबत समाजाकडून जेवढा नकार तिला ऐकायला मिळाला, तेवढा तिचा निर्धार आणखी पक्का होत गेला. इतका की विमानोड्डाणासंदर्भात एकाच वर्षात तब्बल १३ परीक्षा तिनं पास केल्या! सगळ्या आव्हानांना ती पुरून उरली! सध्या ती एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेट करते, पण भविष्यात तिला एअरलाइन ट्रान्स्पोर्ट पायलट बनून मोठमोठी विमानं चालवायची आहेत! ती म्हणते, विमानोड्डाणासंदर्भात प्रत्येक गोष्ट येणं हे माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे!

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Trendingजगातील घडामोडी