इंडोनेशियात स्टॉक एक्सचेंज इमारतीचा पहिला मजला कोसळल्यानं 75 लोक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:16 IST2018-01-15T20:23:52+5:302018-01-16T15:16:25+5:30
इंडोनेशियातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीचा एक मजला कोसळल्यामुळे जवळपास 75 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती इंडोनेशियन पोलिसांनी दिली आहे.

इंडोनेशियात स्टॉक एक्सचेंज इमारतीचा पहिला मजला कोसळल्यानं 75 लोक जखमी
जकार्ता- इंडोनेशियातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीचा एक मजला कोसळल्यामुळे जवळपास 75 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती इंडोनेशियन पोलिसांनी दिली आहे. ज्या वेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचा काही भाग निखळला, त्यावेळी काचा, धातू आणि इतर सामग्री तळमजल्यावर कोसळल्या. त्यामुळे या अपघातात जवळपास 75 लोक जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जकार्ता पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ही घटना कोणत्याही स्फोटानं झालेली नाही. सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या छायाचित्रांमुळे इंडोनेशियात या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. एका प्रत्यक्षदर्शीनंही या घटनेचा वृत्तांत सांगितला आहे. मी अनेकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलंय. अनेक लोकांना इमारतीच्या बाहेर आणलं गेलं.
रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांना इमारतीच्या बाहेरील गवतावर झोपवण्यात आलं होतं. लॉबी इमारतीच्या ढिगा-यानं भरलेली होती. इमारतीत काम करणा-या अनेक कर्मचा-यांना सुखरूपरीत्या बचाव पथकानं बाहेर काढलं. बचाव पथक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अद्यापही ढिगारा हटवण्याचं काम करत आहेत. बचावकार्य पथकानं ढिगारा उपसला असून, आणखी कोणी जखमी नाहीत ना, याचा तपास करत आहेत.
Floor at Indonesia's stock exchange collapses.
— AFP news agency (@AFP) January 15, 2018
Video images by Amailia Putri Hasniawati pic.twitter.com/lAQGv0mb6S