कॉकपिटमध्ये 18 वर्षाच्या मुलाने केली चूक, फ्लाइट Crash; महिला पायलटचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:16 IST2022-10-10T13:12:58+5:302022-10-10T13:16:00+5:30
ही घटना अमेरिकेतील वर्जिनियाची आहे. या अपघातात निधन झालेल्या 23 वर्षीय महिला पायलटचं नाव विक्टोरिया थेरेसी इजाबेल लजुंगमॅन आहे. ती मूळची स्वीडनची राहणारी होती.

कॉकपिटमध्ये 18 वर्षाच्या मुलाने केली चूक, फ्लाइट Crash; महिला पायलटचा मृत्यू
18 वर्षाच्या मुलाला फ्लाइट उडवण्याचा ट्रेनिंग देत असलेल्या एका महिला Instructer चा मृत्यू झाला. ट्रेनिंग दरम्यान 18 वर्षाच्या मुलाने एअरक्राफ्ट नोज वरच्या बाजूने जास्त वाकवलं. ज्यामुळे फ्लाइट आउट ऑफ कंट्रोल झाली आणि मग अपघात झाला.
ही घटना अमेरिकेतील वर्जिनियाची आहे. या अपघातात निधन झालेल्या 23 वर्षीय महिला पायलटचं नाव विक्टोरिया थेरेसी इजाबेल लजुंगमॅन आहे. ती मूळची स्वीडनची राहणारी होती. वर्जिनियाच्या हॅम्पटन यूनिव्हरसिटीत शिक्षण घेतल्यावर ती फ्लाइट Instructer झाली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, 6 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता ट्रेनिंगसाठी महिला पायलट 18 वर्षीय ओलुवागबोहुमी अयोमाइड ओयबोडसोबत गेली होती. यादरम्यान हा अपघात झाला.
फ्लाइट टेकऑफ दरम्यान ओयबोडने एअरक्राफ्टचं नोज वरच्या बाजूने जास्त वळवलं होतं. यामुळे 100 फूट उंचीवर गेल्यावर फ्लाइट आउट ऑउ कंट्रोल झाली होती. नंतर खाडीत पडून फ्लाइट Carsh झाली.
पायलट लजुंगमॅनला जागीच मृत घोषित करण्यात आलं. महिलेसोबत फ्लाइटमध्ये दोन मुले होते. ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.