शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

CoronaVirus News : २० वर्षांत चार घातक व्हायरस पसरवणाऱ्या चीनवर बंदी घाला; अमेरिकेच्या सीनेटमध्ये प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:39 IST

रिपब्लिकन खासदारांनी मंगळवारी असा कायदा आणण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळू शकेल.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्यानं चीनच्या भूमिकेवर प्रश्न विचारत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चीनवर निशाणा साधला आहे.चीनने गेल्या 20 वर्षांत जगाला 5 मोठी संकटे दिली आहेत. या संकटांमध्ये सार्स, एव्हिएन फ्लू, स्वाइन फ्लू आणि कोरोना व्हायरस या 4 व्हायरसची चीनमधूनच उत्पत्ती झाली.

वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्यानं चीनच्या भूमिकेवर प्रश्न विचारत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चीनवर निशाणा साधला आहे. चीनने गेल्या 20 वर्षांत जगाला 5 मोठी संकटे दिली आहेत. या संकटांमध्ये सार्स, एव्हिएन फ्लू, स्वाइन फ्लू आणि कोरोना व्हायरस या 4 व्हायरसची चीनमधूनच उत्पत्ती झाली. आता संक्रमणांचा सिलसिला थांबवला पाहिजे. दुसरीकडे अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. रिपब्लिकन खासदारांनी मंगळवारी असा कायदा आणण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळू शकेल.रॉबर्ट ओब्रायन म्हणाले, आम्हाला माहीत आहे की, कोरोना व्हायरस चीनमधील वुहान शहरातून जगभर पसरला आहे, याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. व्हायरसचा उगम प्रयोगशाळेतून झाला असेल किंवा मांस बाजारातून, पण पुन्हा पुन्हा चीनचे नाव येणं त्यांच्यासाठी चांगलं नाही. आता संपूर्ण जग चिनी सरकारला सांगेल की, आम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या संकटांचा सामना करू शकत नाही. ओ ब्रायन म्हणाले की, चीन इच्छा असती तर त्याला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवता आला असता. आम्ही आरोग्य तज्ज्ञांना पाठवण्याची ऑफर दिली होती, पण त्यांनी नकार दिला.सिनेटमध्ये बंदी घालण्याचा प्रस्ताववृत्तसंस्था एएफपीच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. रिपब्लिकन खासदारांनी असा कायदा तयार केला आहे, ज्यामुळे ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळेल. खासदार जिम इनहॉफ यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, 'या जागतिक साथीला चीनच्या कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरायला हवे, कारण त्यातील त्यांची भूमिका निश्चित केली गेली आहे. चीनने संक्रमणाच्या प्रारंभाच्या काळात जगाला अंधारात ठेवले आणि विश्वासघात केला. चीनच्या या फसवणुकीने जगातील मौल्यवान वेळ आणि जीवन उद्ध्वस्त झाले आहे. 'प्रस्तावित कायद्याला 'कोविड-19 अकाउंटबिलिटी बिल' असे नाव देण्यात आलं आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, अध्यक्ष ट्रम्प यांनी संसदेला 60 दिवसांच्या आत चीनने संक्रमणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे की नाही हे सांगावं लागणार आहे. चीनच्या भूमिकेत संशय आढळल्यास यासंदर्भात संयुक्त राष्ट्र किंवा त्यांच्याशी संबंधित संघटनांना(जसे की डब्ल्यूएचओ) स्वत: चा तपास सुरू करता येणार आहे. कायद्यानुसार ट्रम्प यांनी हे देखील सांगावं लागणार आहे की, चीननं खरंच वुहानमधला तो प्राण्यांचा बाजार बंद केलेला आहे की नाही. हाँगकाँगमध्ये अटक केलेल्या लोकशाही समर्थकांना सोडून दिले आहे.चीनच्या जिलीन शहराच्या नगराध्यक्षांचा इशारा कोरोना विषाणूची लागण आणखी वाढू शकते, असा इशारा चीनच्या जिलीन शहराचे उपनगराध्यक्ष गाय डोंगपिंग यांनी दिला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डोंगपिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, जिलीन शहरातील संक्रमणावर मात करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. जिलीन शहर आणि प्रांताने यापूर्वीच बाहेर जाणारी ट्रेन सेवा बंद केली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊनच्या काळातही जामियाच्या विद्यार्थ्याला मिळाली ४१ लाखांच्या नोकरीची ऑफर

CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

CoronaVirus News: मोठं यश! भारताने 'फेलुदा' स्ट्रिप केली विकसित; आता काही मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन