फ्लोरिडामधील शाळेत माजी विद्यार्थ्याकडून गोळीबार, 17 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 08:54 IST2018-02-15T02:43:40+5:302018-02-15T08:54:08+5:30
अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांत असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

फ्लोरिडामधील शाळेत माजी विद्यार्थ्याकडून गोळीबार, 17 जणांचा मृत्यू
फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांत असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडामधील पार्कलॅन्ड येथील स्टोनमॅन डगलस शाळेत बुधवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबार करणा-या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून शाळेचा परिसर लॉकडाऊन केला आहे. निकोलस क्रुज असे या हल्लेखोराचे नाव आहे. निकोलस हा या शाळेचा माजी विद्यार्थी असून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे.
#UPDATE 17 dead in Florida school shooting: AFP #USA
— ANI (@ANI) February 15, 2018
येथील स्थानिक अधिका-यांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, निकोलस शाळेत घुसल्यानंतर त्याने फायर अलॉर्म वाजवला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी शाळेतील विद्यार्थी वर्गांमध्येच लपून बसले होते. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी शाळेच्या इमारतीला घेरले आणि शाळेतील विद्यार्थ्यांची सुटका केली. याचबरोबर, या गोळीबाराची घटना घडल्यानंतर एक तासाहून अधिक वेळानंतर निकोलसला पोलिसांनी अटक केल्याची माहिती येथील ब्रोवार्ड काऊंटीच्या शेरिफ कार्यालयाने माहिती दिली. तसेच, या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा शेरिफ कार्यालयाने दिली आहे. तर, जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडामधील शाळेतील झालेल्या गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे. तसेच, या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून पीडितांना मदत करण्याचे काम सुरु असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते लिंडसे वाल्टर्स यांनी सांगितले. याचबरोबर, फ्लोरिडाचे गव्हर्नर रिक स्कॉक यांनी सुद्धा या दुर्घटनेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध करत पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
My prayers and condolences to the families of the victims of the terrible Florida shooting. No child, teacher or anyone else should ever feel unsafe in an American school.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 14, 2018
A shooter is still at large after gunfire at a Florida high school, police say: Reuters #USA
— ANI (@ANI) February 14, 2018
Students/Teachers #Douglas High School Remain barricaded inside until police reach you.
— Coral Springs Police (@CoralSpringsPD) February 14, 2018
AVOID THE AREA - Do not attempt to get to the school this perimeter is LOCKED down. https://t.co/sNtQqZYojL
— Coral Springs Police (@CoralSpringsPD) February 14, 2018