मच्छीमाराचा पाक तुरुंगात मृत्यू; पालघरमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 07:24 IST2025-01-25T07:24:14+5:302025-01-25T07:24:32+5:30

Fisherman Dies In Pakistan Jail : पाकिस्तानच्या तुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. बाबू काना असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. या घटनेने पाकिस्तानी तुरुंगात शिक्षा भोगूनही सुटकेची प्रतीक्षा करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील १८ कैद्यांच्या घरांत चिंता व्यक्त होत आहे.  

Fisherman dies in Pakistan jail; Concern in Palghar | मच्छीमाराचा पाक तुरुंगात मृत्यू; पालघरमध्ये चिंता

मच्छीमाराचा पाक तुरुंगात मृत्यू; पालघरमध्ये चिंता

 पालघर  - पाकिस्तानच्यातुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. बाबू काना असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. या घटनेने पाकिस्तानीतुरुंगात शिक्षा भोगूनही सुटकेची प्रतीक्षा करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील १८ कैद्यांच्या घरांत चिंता व्यक्त होत आहे.  

पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यांतील मासेमारी करणाऱ्या खलाशांना पाकिस्तान सीमेलगत समुद्रात बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते. गुरुवारी मृत्यू पावलेल्या बाबू काना याची २०२२ मध्ये पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने  धरपकड केली होती. त्याच वर्षी त्याच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला असल्याची माहिती शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली. १७० मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. त्यांना पाकिस्तानने सोडावे, अशी मागणी देसाई यांनी केंद्राकडे केली आहे.

Web Title: Fisherman dies in Pakistan jail; Concern in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.