शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

आधी पत्नीला केले ठार; पाकच्या मंत्र्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:37 AM

पाकिस्तानातील सिंध प्रांताचे नियोजन व विकासमंत्री मीर हझर खान बिजरानी यांनी कराची येथील निवासस्थानी पत्नी फरीहा रझाक हरुन हिची गोळ््या घालून हत्या केली आणि त्यानंतर त्याच मार्गाने स्वत:लाही संपविले. मंत्री बिजरानी यांचे वय ७१ होते.

कराची - पाकिस्तानातील सिंध प्रांताचे नियोजन व विकासमंत्री मीर हझर खान बिजरानी यांनी कराची येथील निवासस्थानी पत्नी फरीहा रझाक हरुन हिची गोळ््या घालून हत्या केली आणि त्यानंतर त्याच मार्गाने स्वत:लाही संपविले. मंत्री बिजरानी यांचे वय ७१ होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीर हझर खान बिजरानी व त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत भांडणे होत होती. या दोघांचे मृतदेह कराची येथील खयाबान-ए-जाँबाज या भागातील त्यांच्या बंगल्यातील पहिल्या मजल्यावर आढळले. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. पोलिसांनी व फॅरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून बोटांचे ठसे, रक्ताचे नमुने व अन्य पुरावे गोळा केले. त्याचप्रमाणे हझर खान बिजरानी यांच्या बंगल्यामध्ये बसविलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.मीर हझर खान बिजरानी यांच्या डोक्यात गोळी लागली असून, त्यांची पत्नी फरीहा रझाक हरुन हिला दोन गोळ््या लागल्या आहेत. त्यापैैकी एक पोटात व एक डोक्यात शिरली. पिस्तुलामधून या गोळ््या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.दरवाजा लागला फोडावाया दोघांचे मृतदेह जिथे आढळून आले, ती खोली आतून बंद करण्यात आली होती. मीर हझर खान बिजरानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या खोलीचा दरवाजा नोकरांच्या मदतीने तोडला व ते आत शिरल्यानंतर त्यांना बिजरानी व त्यांच्या पत्नीचा मृतदेह तेथे आढळून आला असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याPakistanपाकिस्तान