शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

शतकात प्रथमच वाघांच्या जागतिक आकडेवारीत वाढ, भारतात सर्वाधिक संख्या

By admin | Updated: April 11, 2016 11:48 IST

जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली असून सर्वाधिक वाघ हे भारतातच आहेत.

ऑनलाइन लोकमत  - 
नवी दिल्ली, दि. ११ - जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली आहे. रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये ही व्याघ्रगणना करण्यात आली असून वाघांची संख्या 3890 वर पोहोचली आहे. संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने व्याघ्रगणनेत सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आल्याची माहिती वन्यजीन संवर्धन गटाने दिली आहे.
 
2010मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या 3200 होती. महत्वाची गोष्ट म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचं खूप मोठं योगदान असून अर्ध्यापेक्षा जास्त वाघ भारतामध्येच आहे. भारतामधील जंगलांमध्ये एकूण 2226 वाघ आहेत. 
 
या सर्व्हैमुळे पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 19व्या शतका जगभरातील जंगलात एकूण एक लाख वाघ होते. वाघांची संख्या वाढली आहे यापेक्षा आपण योग्य दिशेन वाटचाल करत आहोत हे महत्वाचं आहे असं  वन्यजीन संवर्धन गटाचे हेमली यांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये 13 देशातील प्रतिनिधींची मंगळवारी बैठक होणार आहे त्याअगोदरच ही जागतिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 
2010 मध्ये वाघांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व देशांनी संवर्धन गटाशी हातमिळवणी करुन 2022 पर्यंत वाघांची संख्या वाढवण्याची शपथ घेतली होती. हॉलिवूड अभिनेता लिओनार्डोनेदेखील या अभियानात सहभागी झाला होता. वाघ अत्यंत महत्वाचा आणि प्रिय प्राणी आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे हे पाहून अभिमान वाटतो, मात्र आपल्याला अजून भरपूर काही करायचं आहे असं लिओनार्डो बोलला आहे.
 
वाघांची संख्या वाढली असली तरी अनेक देशांनी यामध्ये हातभार लावलेला नाही. पाहणीमध्ये रशिया, भारत, भुतान, नेपाळमध्ये वाघांची संख्या वाढल्याचं समोर आलं आहे. 2014मध्ये करण्यात आलेल्या गणनेच्या आधारावर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 
 
विविध देशांमधील वाघांची आकडेवारी  :
देश         वाघांची संख्या
भारत2226
रशिया433
इंडोनेशिया371
मलेशिया250
नेपाळ198
थायलंड 189
बांगलादेश106
भूटान103
चीन७ हून अधिक
व्हिएतनाम५ हून कमी
लाओस 2
कंबोडिया0
 
 म्यानमार सरकारने 2010 मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार 85 वाघ होते मात्र जुनी आकडेवारी असल्याने ग्राह्य धरलेली नाही.