'आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी,नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल'; पाकिस्तानने टेस्लाच्या मालकांनाच दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:59 IST2025-01-23T18:57:04+5:302025-01-23T18:59:19+5:30

इलॉन मस्क यांच्या विधानाविरुद्ध पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त केला आहे. इलॉन मस्क यांनी काही दिवसापूर्वी पाकिस्तानविरोधात विधान केल्याचा दावा पाकिस्तानी लोकांनी केला आहे.

'First Elon Musk should apologize, only then Starlink will be approved'; Pakistan warns Tesla owners | 'आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी,नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल'; पाकिस्तानने टेस्लाच्या मालकांनाच दिला इशारा

'आधी इलॉन मस्क यांनी माफी मागावी,नंतरच स्टारलिंकला मंजुरी मिळेल'; पाकिस्तानने टेस्लाच्या मालकांनाच दिला इशारा

पाकिस्तानने आता टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वी इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंकने पाकिस्तानमध्ये त्यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. पण आता पाकिस्तानने मस्क यांना माफी मागण्याची अट घातली आहे. यानंतर स्टारलिंकला मंजुरी मिळेल असे सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'स्टारगेट प्रोजेक्ट'वरुन इलॉन मस्क अन् ऑल्टमन यांच्यात वाद; कारणही समोर आले

ब्रिटेनच्या ग्रूमिंग गँगवरील इलॉन मस्क यांच्या विधानावर पाकिस्तानने मुद्दा उपस्थित केला आहे. काही पाकिस्तानी खासदारांनी मस्क यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी खासदारांनी इलॉन मस्क यांच्यावर पाकिस्तानविरोधी प्रचार पसरवल्याचा आरोप केला आहे.

स्टारलिंकने पाकिस्तानमध्ये परवान्यासाठी केला अर्ज

स्टारलिंकने पाकिस्तानमध्ये परवान्यासाठी अर्ज केला आहे. यावर सरकारकडून अजूनही मंजुरी मिळालेली नाही. बुधवारी, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार संसदीय समितीला स्टारलिंकच्या अर्जाचे मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून एका बैठकीत नवीन माहिती मिळाली.

संसदीय समितीचे अध्यक्ष पलवाशा मोहम्मद झई खान म्हणाले की, अनेक खासदारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील इलॉन मस्क यांच्या विधानाचा निषेध केला. या विधानाला पाकिस्तानविरोधी प्रचार म्हटले आहे. पलवाशा म्हणाले की, बैठकीत असेही म्हटले आहे की, स्टारलिंकला माफी मागण्याच्या अटीवर मान्यता द्यावी. हे अटीमध्ये असावे असं आम्ही म्हणत नाही. पण हा चर्चेचा भाग होता आणि आम्ही फक्त आमच्या शिफारसी सरकारला देऊ शकतो, असंही ते म्हणाले. 

उद्योगपती इलॉन मस्क यांनी या महिन्यात ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यांनी ब्रिटनमधील टोळ्यांना तयार करण्याचा मुद्दा उपस्थित केला. या टोळ्यांना तयार करण्यासाठी पाकिस्तानी लोकांना जबाबदार धरले जात आहे. पाकिस्तानचे नेते याबद्दल संतप्त आहेत.

यूकेमधील रोदरहॅममध्ये एका टोळीने १६ वर्षांखालील १,४०० मुलींवर बलात्कार केला. या मुलींना नशा करणारे पदार्थ पाजून त्यांना बळी बनवण्यात आले. या प्रकरणाचा तपास २०१४ मध्ये पूर्ण झाला. न्यायालयाने मोठ्या संख्येने लोकांना दोषी ठरवले. यातील बहुतेक दक्षिण आशियाई वंशाचे होते. 

प्रियंका चतुर्वेदी यांच्या पोस्टवरुन सुरु झाला वाद

इलॉन मस्क यांच्या एका पोस्टवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी लिहिले की, ते आशियाई ग्रूमिंग गँग नाहीत तर पाकिस्तानी ग्रूमिंग गँग आहेत. पाकिस्तानसाठी सर्व आशियाई लोकांना का दोष द्यायचा?, असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर मस्क यांनी प्रत्युत्तर दिले होते. इलॉन मस्क यांनी लिहिले की, 'ट्रू'. इलॉन मस्क यांच्याबद्दलच्या या प्रतिक्रियेमुळेच पाकिस्तानने राग व्यक्त केला आहे.

Web Title: 'First Elon Musk should apologize, only then Starlink will be approved'; Pakistan warns Tesla owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.