अमेरिकेतील सेंट्रल मिशिगन विद्यापीठात गोळीबार, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 21:17 IST2018-03-02T21:17:14+5:302018-03-02T21:17:14+5:30
अमेरिकेतील सेंट्रल मिशिगन विद्यापीठात गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अमेरिकेतील सेंट्रल मिशिगन विद्यापीठात गोळीबार, दोघांचा मृत्यू
मिशिगन : अमेरिकेतील सेंट्रल मिशिगन विद्यापीठात गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल मिशिगन विद्यापीठात एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यापीठाच्या चॅम्पबेल हॉलमध्ये हा गोळीबार करण्यात आला असून गोळीबार करणा-या संशयित व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची शक्यता माउंट प्लीझंट पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या हल्ल्यात आणखी काही जीवितहाणी झाली आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर येत नाही.
Two people have been shot at Central Michigan University; suspected gunman is still at large and considered armed and dangerous: US Media #USA
— ANI (@ANI) March 2, 2018