स्पोर्ट्स शूजमुळे कामावरून काढले, कंपनीलाच ३२ लाख द्यावे लागले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 10:11 IST2024-12-30T10:10:46+5:302024-12-30T10:11:06+5:30
ब्रिटनमधील २० वर्षीय एलिझाबेथ बेनासीने स्पोर्टस शूज घातले होते; म्हणून ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

स्पोर्ट्स शूजमुळे कामावरून काढले, कंपनीलाच ३२ लाख द्यावे लागले!
ऑफिस आणि तिथे पाळले जाणारे शिष्टाचार यांविषयी अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात. प्रत्येक देशाचे किंबहुना प्रत्येक कार्यालयाचे नियम आणि शिष्टाचार वेगवेगळे असतात. अलीकडेच, ऑफिसशी संबंधित अशाच एका प्रकरणाने लोकांना धक्का बसला. ब्रिटनमधील २० वर्षीय एलिझाबेथ बेनासीने स्पोर्टस शूज घातले होते; म्हणून ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
एलिझाबेथ बेनासीला त्या ऑफिसच्या कोणत्याही औपचारिक ड्रेस कोडची माहिती नव्हती. अखेरीस हे प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा निर्णय मुलीच्या बाजूने आला. एवढेच नाही तर कंपनीला मोठी भरपाईही द्यावी लागली. कोर्टाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एलिझाबेथ बेनासी यांना ३० हजार पौंड (३२ लाख २० हजार ८१८ रुपये) भरपाई देण्यात आली आहे.