अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 12:02 IST2022-08-05T11:52:01+5:302022-08-05T12:02:41+5:30

Fire At Nightclub in Thailand : चोनुबरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यातील नाईट क्लबला ही आग लागली. 10 जण गंभीररीत्या भाजले आहेत.

Fire At Nightclub in Thailand Death toll in Mountain B pub fire in Sattahip district rose to at least 40 | अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर 

अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर 

बँकॉक – थायलंडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नाईट क्लबमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत 40 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीररीत्या भाजले आहेत. चोनुबरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यातील नाईट क्लबला ही आग लागली. हे थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेय भागात आहे. कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊंटन बी नाईट क्लबमध्ये काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

मृतांमध्ये सहभागी असलेले सर्वजण थायलंडचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बँकॉक पोस्टने मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सावंग रोजनाथमस्‍थान फाऊंडेशनचा हवाला देत वृत्त दिले आहे की, आगीत होरपळून 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा नाईट क्लब प्रसिद्ध होता. येथे मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकही येत असत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आगीच्या व्हिडिओमध्ये लोक सुरक्षित स्थळी धावताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी लोक ओरडताना दिसत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: Fire At Nightclub in Thailand Death toll in Mountain B pub fire in Sattahip district rose to at least 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.