शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

समुद्रात बुडालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि चीनमध्ये चढाओढ, नेमकं काय आहे त्यात, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 20:38 IST

United State Vs China: अमेरिका आणि चीनमधील रणनीतिक आणि व्यावसायिक स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, आता हे दोन्ही देश समुद्रात बुडालेल्या एका विमानाला शोधून काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली आहे.

वॉशिंग्टन/बीजिंग - अमेरिका आणि चीनमधील रणनीतिक आणि व्यावसायिक स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, आता हे दोन्ही देश समुद्रात बुडालेल्या एका विमानाला शोधून काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली आहे. अमेरिकी नौदलाचं हे विमान काही दिवसांपूर्वी दक्षिण चीन समुद्रात कोसळलं होतं. या भागावर चीनकडून हक्क सांगण्यात येत असतो  मात्र अमेरिकेकडून येथील चीनच्या कब्जाला विरोध केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी फिलिपिन्समध्ये झालेल्या युद्धसरावात भाग घेतलेल्या अमेरिकेच्या यूएसएस कार्ल विन्सन या विमानवाहू युद्धनौकेवरील एफ-३५सी हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे दक्षिण चीन समुद्रात कोसळले होते. यावरील नऊ सैनिक जखमी झाले होते. तर विमान समुद्रतळाशी जाऊन विसावले आहे. याच विमानाचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि चीनकडून आकाश पाताळ एक केले जात आहे.

अमेरिकेसोबतच चीनकडूनही या विमानाचा शोध घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे या विमानातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या विमानाला उडणारा अत्याधुनिक संगणक असे म्हटले जाते. या एका विमानाची किंमत तब्बल ७५० कोटी रुपये एवढी आहे. तसेच या विमानामध्ये असे काही खास तंत्रज्ञान आहे, जे केवळ अमेरिकावगळता अन्य कुठल्याही देशाकडे नाही.

त्यातील काही वैशिष्ट्ये म्हणजे हे विमान चार क्षेपणास्त्रे घेऊन उड्डाण करू शकते. तसेच याचे इंजिन हे जगातील सर्व लढाऊ विमनांमध्ये सर्वात शक्तिशाली मानले जाते. शक्तिशाली इंजिनाच्या मदतीने ते १२ मैल प्रतितास वेगाने उडू शकते. तसेच या विमानाचे पंख मोठे असून, लँडिंग गिअरही जबरदरस्त आहेत. त्यामुळे ते विमानवाहू युद्धनौकेवर सहजपणे उतरते. तसेच हे विमान जमिनीपासून कमी अंतरावर उडून शत्रूला हुलकावणी देण्यामध्येही सक्षम आहे. तसेच सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हे विमान रियल टाइमवर उड्डाण करताना अन्य सामरिक केंद्रे, विमानं आणि उपकरणांशीही जोडले जाऊ शकते.

या विमानामधील या खास वैशिष्ट्यांमुळेच चीनची त्यावर नजर आहे. तसेच समुद्रातून ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर अमेरिका या विमानाला चीनच्या कब्जात जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तज्ज्ञांच्या मते चीनचे नौदल या विमानाजवळ पोहोचले तर अमेरिकेवर मोठी नामुष्की ओढवणार आहे. तसेच चिनी नौदल या विमानाचे अवशेष ताब्याथ घेण्यासाठी अमेरिकी सैन्याशी दोन हात करू शकते.

असे झाल्यास खूप बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या अमेरिकी नौदल या विमानापासून खूप लांबवर आहेत. तसेच या विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील बॅटरी संपण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत हे विमान चिनी नौदलाच्या ताब्यात सापडले तर एफ३५सी चे तंत्रज्ञानसुद्धा चीनच्या हाती लागू शकते. हे तंत्रज्ञान अद्याप चीनकडे नाही. मात्र ते चीनला सापडल्या अमेरिका आणि चीनमधील संघर्षाला नवे वळण लागू शकते.  

टॅग्स :United Statesअमेरिकाchinaचीनsouth china seaदक्षिण चिनी समुद्र