शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मंदीचा फटका, सरकारकडून फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपवर 'टॅक्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 17:43 IST

सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक कॉलिंगवर टॅक्स आकारण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियाचा वापर आजच्या जमान्यात अनिवार्य बनला आहे. त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्ट्राग्राम ही माध्यमं सर्वात प्रभावी आहेत. आजच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर न करणारा सापडणे क्विचितच शक्य आहे. सध्या तरी सोशल मीडियाचा वापर मोफतच करण्यात येत आहे. केवळ इंटरनेटच्या रिचार्जवर हे फिचर्स वापरण्यात येतात. मात्र, यावर सरकारने टॅक्स लावायला सुरुवात केल्यास काय होईल?. देशातील आर्थिक मंदीमुळे लेबनान सरकारने सोशल मीडियावरील फेसबुक आणि व्हॉट्अप फिचर्सवर टॅक्स घेण्यास सुरुवात केली होती.

लेबनान येथील सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक कॉलिंगवर टॅक्स आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर, लेबनानची राजधानी बेरुत येथील जनतेने रस्त्यावर उतरून सरकारच्या या धोरणाचा निषेध नोंदवला. रस्त्यावरुन विमानतळापर्यंत अनेकांनी हिंसक स्वरुपात आपला विरोध दर्शवला. आंदोलकांनी रस्त्यावर गाडीचे टायर जाळले, तर काही गाड्यांना आग लावली. या आंदोलनाच्या घटनेत आत्तापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 40 पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक जमखी झाले आहेत. 

लेबनान सरकराची आर्थिकस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारला अर्थसंकल्पासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. या कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी सरकारने फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप व्हाईल कॉलिंगवर प्रतिमहा 150 रुपये कर आकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, जनतेच्या तीव्र विरोधानंतर सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला आहे. त्यामुळे सरकारला जनेतपुढे झुकावे लागल्याचं दिसून येतंय. 

टॅग्स :FacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपTaxकरGovernmentसरकार